transfarmer failure complaint दुष्काळ परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाणी नसणे ही एक मोठे समस्या आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे अशा शेतकऱ्यांकडे विजेची उपलब्धता नाही आणि याचे कारण म्हणजे ट्रांसफार्मर खराब असणे.
transfarmer failure complaint
राज्यांमध्ये ग्रामीण भागातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर जळत आहेत किंवा जळालेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या योजनेमधून नवीन ट्रांसफार्मर लावण्याची योजना राबवली जात आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये ट्रान्सफॉर्मर दिले जात आहे.

👉एप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈
परंतु आपल्या भागात असलेला जळालेला ट्रान्सफॉर्मरची माहिती महावितरण पर्यंत पोहोचवणे हे देखील शेतकऱ्यांचा काम आहे. कारण ट्रांसफार्मर खराब आहे, जळालेला आहे हे जर समजले तर महावितरणच्या माध्यमातून ट्रांसफार्मर दुरुस्त करण्यासाठी काही हालचाली केल्या जाऊ शकतात आणि एक तक्रार देखील दाखल होऊ शकते.
यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून महावितरणचे ॲपच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जळालेल्या किंवा खराब झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या तक्रारी दाखल कराव्यात असे आव्हान केले आहे.
हे ही पाहा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन
अशी करा तक्रार?
transfarmer failure complaint यासाठी महावितरणच्या एप्लीकेशनच्या माध्यमातून मोबाईलच्या साहाय्याने अगदी ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळाले आहे त्या ठिकाणाहून तक्रार दाखल करू शकता.
यासाठी गूगल प्ले स्टोअरवरून mahavitaran नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
याची डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून आताच ऍप्लिकेशन डाउनलोड करा.
इन्स्टॉल केल्यानंतर लोकेशन, कॅमेरा अशी सर्व परमिशन विचारल्या जातील त्या द्या.
त्यानंतर लॉगिनसाठी युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करु शकता किंवा या अंतर्गत गेस्ट लॉगिन देखील करू शकता.
परंतु गेस्ट लॉगिनवर क्लिक केल्यानंतर ग्राहक क्रमांक, इतर माहिती प्रत्येक वेळी भरावी लागेल.

👉या ठिकाणी क्लिक करा आणि तक्रार करा👈
ही माहिती जर प्रत्येक वेळी भरायचे नसेल तर एकाच वेळी साइन अप करूनॲप्लिकेशन मध्ये युजर आयडी पासवर्ड क्रिएट करू शकतात.
साइन अप केल्यानंतर ग्राहक नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासवर्ड अशी सर्व माहिती टाका यामध्ये जो युजर आयडी पासवर्ड लॉगिन करताना तो वापरू शकता.
transfarmer failure complaint मेल आयडी, मोबाईल नंबर यावर वेळोवेळी SMS/MAIL दिले जातील.
युजर आयडी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर लॉगिनवर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर जी कलेक्शन ऍड केलेली आहे ती दाखवली जातील सोबतच ऍड करायची असतील तर ॲड देखील करू शकता.
ट्रान्सफॉर्मर जळाले असेल किंवा खराब परिस्थितीत असेल तरच या अंतर्गत तक्रार द्यायची आहे.
यासाठी रिपोर्ट ट्रान्सफर फैलुरवर क्लिक करा.
हे ही पाहा : सोलर पंप योजनेतील त्रुटी कशा दुरुस्त कराव्यात
क्लिक केल्यानंतर ग्राहक क्रमांक दाखवले जातील ज्या ग्राहक क्रमांकासाठी तक्रार द्यायची असेल तो सिलेक्ट करा.
सिलेक्ट केल्यानंतर लोकेशनची परमिशन द्या.
जर ट्रान्सफॉर्मर जळाला असेल आग लागली असेल अशा परिस्थितीमधलीच कंप्लेंट यामध्ये द्या अशा प्रकारची सूचना दाखवली जाईल याला ओके करा.
नंतर जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड सर्व दाखवले जाईल यात नियरेस्ट लँडमार्कमध्ये जवळील पत्ता द्या.
ट्रान्सफॉर्मर कधीपासून नादुरुस्त आहे त्याची तारीख, महिना आणि वर्ष सिलेक्ट करा.
त्याखाली फोटो काढण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे त्यावर क्लिक करा.

हे ही पाहा : कांदा चाळ अनुदान, असा करा अर्ज
transfarmer failure complaint क्लिक केल्या नंतर जर कॅमेरासाठी परमिशन दिलेली तर परमिशन विचारली जाईल ती द्या.
यामध्ये खराब झालेल्या ट्रांसफार्मरचा फोटो काढा.
त्यानंतर खाली त्याबद्दल डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द फॉल्ट यात नेमकी काय झाले आहे, कशामुळे जाळायला किंवा इतर कारण असेल ती माहिती यामध्ये भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर खाली सबमिट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करूनNअर्ज दाखल करा.
हे ही पाहा : महिला बचत गटांना शेळी गट वाटप
सबमिट केल्यानंतर एक नंबर दिला जाईल याचाच एक SMS, MAIL पाठवला जाईल.
पुढे ही तक्रार दाखल केली जाईल.
त्यावर निपटा करण्याची तयारी महावितरणच्या माध्यमातून केली जाईल. transfarmer failure complaint