tds meaning​ 2024 टीडीएस म्हणजे काय?

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

tds meaning​ टीडीएस (टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स) म्हणजे काय तर टीडीएस ची संकल्पना आयकर विभागाने कर संकलनाची प्रक्रिया अधिक चांगली व्हावी यासाठी आणली होती. ही एक अशी व्यवस्था आहे ज्याअंतर्गत कुठलीही कंपनी किंवा व्यक्ती जी दुसऱ्या व्यक्तीला एखादा पेमेंट करते मग ते वेतन असो व्याज असो किंवा कमिशन असो आणि जर ती रक्कम एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्ती असेल तर ती रक्कम देणारी व्यक्ती म्हणजे कंपनी किंवा बँक त्यातून काही टक्के भाग कापून घेते आणि आयकर विभागाकडे सुपूर्द करते.

याला टॅक्स डिडक्शन सोर्स म्हणजे रक्कम देताना कापून घेतला जाणारा कर असं म्हणतात. थोडक्यात टीडीएस म्हणजे आयकाराचाच भाग आहे जो संबंधित रक्कम देताना आगाऊ कापून घेतला जातो.

tds meaning​

👉टीडीएस म्हणजे काय सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर

tds meaning​ जो पगार होतो तो जर करपात्र असेल तर त्यावर आयकर भरावा लागतो.
पण आयकर विभागाच्या निर्देशानुसार कंपनी त्यातले दहा टक्के रक्कम पगार देतानाच कापून घेते आणि आयकर विभागाकडे सुपूर्द करते.
याला एक प्रकारचा आगाऊ कर किंवा ॲडव्हान्स टॅक्स सुद्धा म्हणता येईल.

हे ही पाहा : शेतात हद्द कायम मोजणी काय असते आणि ती काशी करायची

एक उदाहरण

50 हजार रुपये महिना म्हणजे वर्षाचा पगार सहा लाख रुपये जुन्या करारचनेप्रमाणे हे उत्पन्न करपात्र आहे.
त्यामुळे कंपनी पगारातून म्हणजे 50 हजार रुपये मधून दहा टक्के रक्कम म्हणजे पाच हजार रुपये दरमहा कापून घेईल आणि टीडीएस म्हणून आयकर विभागाकडे जमा करेल याला टीडीएस असे म्हणतात.

👉केंद्र सरकार लाडक्या बहिणींना देणार स्कूटी, जाणून घ्या वायरल मेसेज मगच सत्य…👈

आता टीडीएस किती कापला हे कसं कळते

tds meaning​ तर जी पगाराची पावती मिळते सॅलरी स्लिप असं म्हणतात.
त्यावर बहुतेक वेळा टीडीएसच्या रकमेचा उल्लेख केलेला असतो जर नसेल तर जेव्हा फॉर्म सिक्सटीन मिळेल तेव्हा त्यावर नक्की टीडीएसच्या रकमेचा उल्लेख असतो.
फॉर्म सिक्सटीन हे कंपनी देते ज्यात वर्षभराच्या पगारी उत्पन्नाची सगळी माहिती असते.

हे ही पाहा : बिल वेळेवर न भरल्यास, 30 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

हाच टीडीएस मुदत किंवा आवर्ती ठेवींवर वजा केला गेला असेल तर तुम्हाला बँकेकडून टीडीएस सर्टिफिकेट मिळवता येते ज्यात हा उल्लेख केलेला असतो याला फॉर्म 16a असे म्हणतात. tds meaning​
जर फॉर्म 16 किंवा 16 मिळालाच नाही तरी आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन त्याचा तपशील बघू शकता.
हा तपशील फॉर्म 26as मध्ये मिळेल ज्यामध्ये कोणी टीडीएस कापला किती कापला इत्यादी सारखी संपूर्ण माहिती दिलेली असते.

हे ही पाहा : मोफत वीज योजना 2025 ; जाणून घ्या फायदे

टी डी एस

tds meaning​ पगार जर करपात्र नसेल तर टीडीएस कापला जात नाही मात्र जरी तुमचे उत्पन्न करपात्र नसेल तरीसुद्धा बँकेतल्या ठेवीवरील व्याज 40000 पेक्षा जास्त झाले आणि जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत पन्नास हजार पेक्षा जास्त झाले तर टीडीएस कापून घेतला जातो.
कारण बँकेला तुमचे उत्पन्न करपात्र नाही हे माहिती नसते.
त्यामुळे हे बँकेला सांगावे लागते की उत्पन्न करपात्र नाही आणि हे फॉर्म 15g किंवा 15h भरून बँकेला सांगू शकता.
टीडीएस फक्त पगार किंवा बँकेतील ठेवींवरच कापला जातो असे नाही.
टीडीएस कापला जाण्याचे अनेक प्रकार आहेत.
टीडीएस ची टक्केवारी प्रत्येक उत्पन्नाला सारखी नसते प्रत्येक उत्पन्नाच्या प्रकारानुसार ती वेगळी असते.

हे ही पाहा : मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी खूशखबर!!

जर टीडीएस कापला गेला आणि उत्पन्न करपात्र नसेल तर

टीडीएसची ती रक्कम परत मिळवता येते त्यासाठी आयकर रिटर्न भरावा लागतो.
आणि दिलेल्या माहितीची आयकर विभागाकडून तपासणी केल्यानंतर जर आयकर विभागाला हे पटले की टीडीएसची रक्कम परत मिळवण्यास पात्र आहेत. tds meaning​
तर ती रक्कम थेट बँक खात्यात जमा होते म्हणजेच बचत खात्यात जमा होते याला इन्कम टॅक्स रिफंड असे म्हणतात.

हे ही पाहा : ओबीसी युवकांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment