msrtc ticket booking app​ 2025 लालपरीच्या प्रवाशांसाठी खुशखबर ! नवर्षापासून बसगाड्यांचे लोकेशन दिसणार प्रवाशांच्या मोबाईलवर

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

msrtc ticket booking app​ माझी मुलगी-मुलगा, आजी-आजोबा, आई-वडील एसटी बसमधून पुणे, मुंबई किंवा अन्य दूरवरील ठिकाणावरून येत आहेत, पण त्यांचा फोन लागत नाही. त्यांना त्या मार्गाची फार माहिती नाही, ते कुठपर्यंत आले असतील, ही चिंता आता प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’द्वारे दूर होणार आहे. बसची वाट पाहात तासन्तास बस स्थानकावर देखील थांबावे लागणार नाही. कोणत्या मार्गावरील, कोणती एसटी बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, याची माहिती आता त्या अॅपद्वारे घरबसल्या समजणार आहे.

रेल्वे, मेट्रो असो की अन्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घरबसल्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण, सामान्यांना त्यांची लालपरी कोठे आहे, कधीपर्यंत स्थानकावर येईल, या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. त्यावर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उपाय शोधला असून त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे.

msrtc ticket booking app​

👉बसगाड्यांचे लोकेशन पाहण्यासाठी क्लिक करा👈

आतापर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील दहा हजार बसगाड्यांना ‘जीपीएस’ सिस्टिम बसविण्यात आली आहे. आता, त्या यंत्रेणीची सद्य:स्थिती काय, याची पडताळणी केली जात आहे. याशिवाय उर्वरित पाच हजार बसगाड्यांनाही ही यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यासंबंधीची यंत्रणा महामंडळाकडे उपलब्ध असून, नवीन वर्षात आता प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

हे ही पाहा : मोफत वीज योजना 2025 ; जाणून घ्या फायदे

msrtc ticket booking app​ एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणीमुळे वेळेनुसार बस स्थानकावर पोचायला विलंब होत असल्यास त्याची माहिती देखील त्या अॅपद्वारे समजणार आहे.

👉शेतकऱ्यांसाठी खूशखबर, तुकडेबंदी कायद्यात बदल, शासनाचा GR आला..👈

अनधिकृतपणे बस कोठे थांबविली जाते का किंवा ज्या ठिकाणी थांबा आहे तेथे नियोजित वेळेपेक्षा जास्तवेळ बस थांबविली जातेय का, याची देखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजेल. एकूणच या यंत्रणेमुळे लालपरीच्या वेळापत्रकात सूसूत्रता येणार असून, प्रवाशांनाही बसगाड्यांच्या वेळेचा भरोसा मिळणार आहे.

हे ही पाहा : ऑनलाइन वीज बिल भरून मिळवा स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच

नववर्षात प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध

msrtc ticket booking app​ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविली जाणार आहे. आतापर्यंत जवळपास दहा हजार गाड्यांना ही यंत्रणा बसविली असून त्याची सद्यःस्थिती पाहून उर्वरित गाड्यांनाही ती यंत्रणा बसविली जाईल. नववर्षात एसटीच्या सर्व प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर प्रत्येक बसगाडीचे लोकेशन दिसेल, त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे.

हे ही पाहा : ओबीसी युवकांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज!

व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमची वैशिष्टे…

  • अॅन्ड्राईड मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागणार महामंडळाचे ‘एमएसआरटीसी’ अॅप
  • महामंडळाची प्रत्येक बस कुठून किती वाजता निघेल व कधीपर्यंत नियोजित ठिकाणी पोचेल अॅपवरुन समजणार
  • गुगल मॅपवरुन समजणार बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागणार नाही
  • हात करूनही बस थांबली नाही, प्रवाशाने केलेल्या या तक्रारीची अॅपवरुन होईल खात्री
  • एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या नातेवाइकांचीही दूर होणार चिंता, त्यांनाही येणार वेळेचा अंदाज msrtc ticket booking app​

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचं कर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment