PM Kisan Online Correction आपले DBT अनुदान नेमकं कोणत्या खात्यात येईल? NPCI पोर्टलवरून आधार लिंक बँक खातं कसं चेक करावं ते जाणून घ्या.
शासनाच्या विविध योजनांमधून — जसे की PM किसान, नमो शेतकरी योजना, पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, धान बोनस वगैरे — मिळणारं अनुदान थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित केलं जातं.
PM Kisan Online Correction
पण अनेकदा प्रश्न येतो — “हे पैसे नेमकं कोणत्या खात्यावर जमा होतात?”
जर तुमच्याकडे दोन बँक खाती असतील, एक बंद असेल, किंवा खातं बदलायचं असेल — तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. या लेखात आपण NPCI पोर्टल वापरून बँक खाते कसं तपासायचं आणि बदलायचं ते पाहणार आहोत.

👉तुम्हाला PM KISSAN चा हप्ता मिळणार का आताच पाहा👈
DBT म्हणजे काय आणि कोणते पैसे मिळतात?
PM Kisan Online Correction DBT म्हणजे Direct Benefit Transfer, ज्यामध्ये सरकारी अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जातं. यामध्ये खालील योजना येतात:
- पीएम किसान योजना
- नमो शेतकरी योजना
- पीक विमा योजना
- अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारं अनुदान
- भावांतर योजना
- धानाचा बोनस
हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! जाणून घ्या हवामानाचा सविस्तर अंदाज
DBT कोणत्या खात्यावर जमा होतो?
जर तुमचं अनेक बँक खाती असतील, तर सरकार NPCI (National Payments Corporation of India) च्या माध्यमातून ज्या खात्याशी तुमचं आधार क्रमांक लिंक आहे, त्या खात्यावर अनुदान जमा करतं.
✅ जर एखादं खातं बंद असेल, आणि दुसरं चालू असेल पण ते लिंक नसेल, तर पैसे अडकू शकतात.
✅ म्हणूनच, खातं आधारशी लिंक आहे का हे तपासणं आवश्यक आहे.

👉शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कृषी योजनांची लाभार्थी यादी जाहीर!👈
NPCI पोर्टलवरून आधार लिंक खातं कसं तपासाल?
PM Kisan Online Correction खाली दिलेली सोपी स्टेप्स वापरून तुम्ही 2 मिनिटांत तुमचं खातं चेक करू शकता:
स्टेप 1: NPCI च्या वेबसाईटवर जा
वेबसाईट: 👉 https://www.npci.org.in
Google वर “NPCI DBT account check” असं सर्च करूनही तुम्ही पोर्टलवर जाऊ शकता.
हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट – जिल्हानिहाय पीक विमा वितरण सुरु!
स्टेप 2: Consumer → Aadhaar Seeding Status निवडा
वेबसाईटवर गेल्यावर मेनू मधून “Consumers” या विभागावर क्लिक करा
→ त्यानंतर “Aadhaar Seeding Status” या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 3: माहिती भरा
- तुमचा आधार क्रमांक टाका
- कॅप्चा कोड भरा
- ओटीपीसाठी तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP येईल
- ओटीपी एंटर करा आणि सबमिट करा
स्टेप 4: तुमचं बँक खातं दिसेल
PM Kisan Online Correction सिस्टिममध्ये जे खाते NPCI ला मॅप आहे, त्याचं नाव, बँकेचं नाव, अकाउंट नंबर (आंशिक) दिसेल. याच खात्यावर डीबीटीचे पैसे जमा होणार आहेत.

हे ही पाहा : नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी 12,000 रुपये वार्षिक पेन्शन योजना – पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि सर्व माहिती
खाते बंद असेल किंवा बदलायचं असेल तर काय?
जर NPCI ला लिंक असलेलं खाते बंद असेल, किंवा ते बदलायचं असेल, तर:
- नवीन बँकेत जा
- तुमचा आधार क्रमांक त्या खात्याशी लिंक करा
- बँक कर्मचारी NPCI ला नवीन खाते मॅप करतील
- 24-48 तासात अपडेट होईल
✍️ खातं अपडेट झालं की नवीन अनुदान त्याच खात्यावर जमा होईल.
हे ही पाहा : वाळू धोरण, घरकुल लाभ, जात वैधता प्रमाणपत्र मुदतवाढ आणि अधिक
कितीही बँक खाती असली तरी एकच खातं लिंक असतं
PM Kisan Online Correction NPCI च्या डेटाबेसमध्ये फक्त एकच बँक खाते “Active for DBT” असतं.
अशा वेळी जर तुम्ही अनुदानासाठी एक खाते बँकेत दिलं, आणि दुसरं NPCI ला लिंक असेल — तर अनुदान NPCI लिंक खात्यावरच येईल.
✅ त्यामुळे फॉर्म भरताना दिलेलं खाते आणि NPCI लिंक खातं एकच आहे का हे तपासा!
शेतकऱ्यांनो, DBT अंतर्गत मिळणाऱ्या सर्व योजनांचे पैसे फक्त आधारशी NPCI मॅप असलेल्या खात्यावरच जमा होतात. त्यामुळे नेहमी तपासणी करत राहा:
- कोणतं खातं NPCI ला लिंक आहे?
- बंद आहे का?
- नवीन खातं दिलं आहे का?

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी शासनाच्या नवीन योजना आणि मोहिमा – प्रत्यक्ष अंमलबजावणीला मिळणार गती
PM Kisan Online Correction जर अडचण असेल, तर बँक किंवा कृषी विभागाशी त्वरित संपर्क साधा.