Farmer Unique ID शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच Farmer Unique ID कसे ऑनलाईन पद्धतीने बनवायचे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
Farmer Unique ID
16 डिसेंबर 2024 पासून राज्यात शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया तलाठी कार्यालयांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.याबरोबरच, सीएससी (Common Service Centers) च्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
👉Farmer Unique ID बनवण्यासाठी क्लिक करा👈
कसे कराल नोंदणी?
- वेबसाइट:
- आपल्याला mhfristgov.in या संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांचे ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल.
- सीएससी लॉगिन: वेबसाइटवर पोहोचल्यावर, “लॉगिन विथ सीएससी” वर क्लिक करा. येथे आपला सीएससी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- आधार नंबर ओळख प्रमाणन:
- शेतकऱ्यांचा आधार नंबर टाका आणि त्यानंतर ओटीपी (One-Time Password) किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण पद्धती निवडा.
- ओटीपी निवडल्यास, आपल्या आधार संलग्न मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी टाकून, माहिती व्हेरिफाय करा. Farmer Unique ID
हे ही पाहा : 1 रुपयात पीकविमा योजना बंद होणार?
- शेतकऱ्याची माहिती भरावी लागेल:
- शेतकऱ्याचे नाव (मराठीत आणि इंग्रजीत), वय, जन्मतारीख, प्रवर्ग (SC, ST, OBC, General) आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
- आधारनुसार माहिती: आधार कार्डावर दिलेली शेतकऱ्याची माहिती थोडक्यात दाखवली जाईल आणि त्या माहितीला आपल्याला पुष्टी द्यावी लागेल.
- शेत जमिनीची माहिती:
- आपल्या शेत जमिनीचा सर्वे नंबर, गाव, तालुका, जिल्हा यासारखी माहिती भरून शेत जमीन एड करा. जर आपल्याकडे अधिक एक किंवा अधिक जमीन असेल तर ती देखील ऍड करू शकता.
- जमिनीचा प्रकार (Agriculture/Non-Agriculture) निवडा.
👉घरात एकालाच पीएम किसानचा हप्ता, pm Kisan new registration होत का? पहा सविस्तर…👈
- कन्सेंट आणि व्हेरिफिकेशन:
- शेतकऱ्याच्या कन्सेंट (अनुमती) च्या बॉक्सला टिक करा. Farmer Unique ID
- सीएससी युजर आयडी ने पुष्टी करा की शेतकरी ओळखले आहेत आणि त्याची माहिती योग्य आहे.
- प्रोसीजर पूर्ण:
- सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह करा.
- ओटीपी घेऊन अंतिम व्हेरिफाय करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.
- आधार प्रमाणीकरण:
- आधार नंबर टाकल्यावर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकून सबमिट करा.
- सक्सेसफुल नोंदणी: नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला प्रिंट किंवा पीडीएफ स्वरूपात ओळखपत्र मिळेल.
हे ही पाहा : शेत रस्त्यांचे वाद आणि त्याचे निराकरण: एक गंभीर समस्या आणि त्यावरचे उपाय
महत्त्वाचे टीप
- Farmer Unique ID सीएससी च्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे आपल्या नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊन देखील शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवू शकता.
- तलाठी कार्यालयातून देखील नोंदणी करता येईल.
- या कार्डाचे महत्त्व पीएम किसान, पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, तसेच इतर सरकारी योजनांसाठी अनिवार्य आहे.
हे ही पाहा : या बँकेच्या थकीत कर्जदारांना मोठा दिलासा
Farmer Unique ID शेतकऱ्यांसाठी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवणे ही प्रक्रिया सरकारी योजना आणि लाभ मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचे लाभ मिळवणे सोपे होईल. हे ओळखपत्र बनवण्यासाठीची माहिती आपणास नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे.