e peek pahani कमी उत्पादनामुळे राज्य सरकारने अर्थसंकल्पात गेल्या वर्षातील खरीप हंगामाच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या अनुदानाचा मुहूर्त काढत वाटप केले.
e peek pahani
यात केवळ ई – पीक पाहणी करूनही अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत आली नाहीत. या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान देण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले. मात्र निवडणूक संपताच सरकारने ई – पीक पाहणी करूनही अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन अट घातली आहे. या शेतकऱ्यांकडे तलाठ्याकडून सोयाबीन पीक पेरा नोंदीचे प्रमाणपत्राची मागणी केली जात असल्याने राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार काही नाही, असा प्रश्न पडला आहे.
👉ई पीक पाहणी एप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈
अर्थसंकल्पात अनुदान जाहीर करूनही त्याचे वाटप करण्यासाठी सरकारकडून तारीख पे तारीख खेळ सुरू होता. यातच हे अनुदान ई-पीक पाहणीवर पिकांचे नोंद केलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. मध्यंत्तरी हा निर्णय मागे घेण्यात आल्याचा गवगवा झाला. परळी (जि. बीड) येथे झालेल्या कृषी महोत्सवात दस्तूरखूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई पीक पाहणीची अट शिथिल केल्याची घोषणा केली होती.
हे ही पाहा : मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी खूशखबर!!
e peek pahani मात्र ती प्रत्यक्षात आलीच नाही. यात ई – पीक पाहणी अॅपवर नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीत आली नाहीत. तर यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाकडून पोर्टलवर भरण्यात आली. यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुदानाचे वाटप झाले. मात्र, ई – पीक पाहणी करूनही यादीत नाव न आलेले शेतकरी अनुदानासाठी लटकले.
👉शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेत 12000 रुपये मिळणार?👈
या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्याही तयार करण्यात आल्या. विधानसभा निवडणूक होताच हे अनुदान मिळेल, अशी आशा असतानाच ई – पीक पाहणी करूनही कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तलाठ्याकडून सोयाबीनचा पिकपेरा नोंद असल्याबाबतच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत आहे.
हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजना 2025
e peek pahani हाच निकष यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना का लागू करण्यात आला नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत असून सरकारला ई – पीक पाहणी करूनही यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची आता इच्छा उरली नसल्याचे शेतकरी उद्विग्न होऊन बोलत आहेत.
हे ही पाहा : रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार
चुकीची माहिती भरलेल्यांनाही प्रतीक्षाच
e peek pahani कृषी विभागाकडून अनुदानासाठी अनेक शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर चुकीची भरल्याने त्यांना अनुदान मिळाले नाही. ही माहिती दुरुस्त करण्यासाठी पोर्टलवर ईडीट ऑप्शन येण्याची प्रतीक्षा कृषी विभागाला होती. काही दिवसापूर्वी हे ऑप्शन येऊनही माहितीत दुरुस्ती होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान लटकले आहे. यादीतील शेतकऱ्यांकडून आधार क्रमांक व सहमती पत्र घेण्यात आले.
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
मात्र, काही शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाने चुकीची भरल्याने त्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले. यामुळे ई – पीक पाहणी करून यादीत नाव व आलेले तसेच चुकीची माहिती भरलेले शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.