What is Gram Sabha ग्रामसभा म्हणजे गावकऱ्यांचा हक्काचा मंच. या लेखामध्ये जाणून घ्या ग्रामसभेचे अधिकार, ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या आणि नागरिकांनी कोणते प्रश्न विचारले पाहिजेत जेणेकरून गावाचा विकास होईल.
मित्रांनो, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि २ ऑक्टोबर अशा दिवशी ग्रामसभा घेणे बंधनकारक असते. पण दुर्दैवाने अनेक गावांमध्ये ग्रामसभेत लोकसंख्या कमी दिसते, आणि जे लोक येतात तेही योग्य प्रश्न विचारत नाहीत. यामुळे कारभार मनमानीपद्धतीने चालतो.
What is Gram Sabha
तर आज आपण या ब्लॉगमध्ये समजून घेऊया –
- ग्रामसभा म्हणजे काय?
- ग्रामसभेला कोण सहभागी होऊ शकतो?
- ग्रामसभेत कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
- गावाचा निधी आणि विकासकामांवर नागरिकांची भूमिका
ग्रामसभा म्हणजे काय?
What is Gram Sabha भारतीय संविधानाच्या ७३व्या दुरुस्तीने (१९९२) पंचायती राजव्यवस्था अस्तित्वात आली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अंतर्गत ग्रामपंचायती स्थापन झाल्या.
ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व मतदारांची सभा. म्हणजे गावाच्या मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य आहे.
👉 अधिकृत माहिती – महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग
ग्रामसभा कधी बोलावली जाते?
- प्रत्येक ४ महिन्यांनी किमान एकदा ग्रामसभा घेणे आवश्यक.
- नोटीस ७ दिवस आधी दिली पाहिजे.
- १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर या तीन ग्रामसभा बंधनकारक.
- नागरिकांच्या मागणीनुसार विशेष ग्रामसभा बोलावता येते.

ग्रामसभेत कोण सहभागी होतात?
What is Gram Sabha गावातील सर्व नागरिकांसोबतच खालील अधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे –
- ग्रामसेवक / तलाठी
- शाळेचे मुख्याध्यापक
- पोलीस पाटील
- आरोग्य सेवक / आशा वर्कर
- रेशन दुकानदार
- कृषी सहाय्यक
- वायरमन, जलसेवक, स्वच्छता कर्मचारी
- अंगणवाडी सेविका
- ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी
ग्रामसभेत कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१. ग्रामनिधीचा वापर
- ग्रामनिधी कुठून जमा झाला? (घरफळा, पाणीपट्टी)
- निधी कोणत्या कामावर खर्च झाला?
- निधीचा गैरवापर किंवा भ्रष्टाचार झाला का?
२. गावातील विकासकामे
- आमदार / खासदार निधी किती आला?
- जिल्हा नियोजन निधी (DPDC) कसा वापरला?
- विकास आराखडा प्रत्यक्षात आणला का? What is Gram Sabha
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 | शासनाचा मोठा निर्णय | सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू
३. रोजगार हमी योजना
- किती लोकांना रोजगार मिळाला?
- विहिरी, रस्ते, पाणंद रस्ते यासारखी कामे वेळेत पूर्ण झाली का?
- नवीन कामांची मागणी करणे. What is Gram Sabha
४. मूलभूत सुविधा
- पिण्याच्या पाण्याची समस्या.
- सांडपाणी व्यवस्थापन.
- दिवाबत्ती व वीजपुरवठा.
- रस्त्यांची देखभाल.
- शाळा, अंगणवाडी आणि आरोग्यसेवा सुविधा.
५. शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी
- गावातील वैद्यकीय अधिकारी नियमित येतात का?
- आशा सेविकांचे काम समाधानकारक आहे का?
- वायरमन वीजपुरवठा वेळेवर करतो का?
- रेशन दुकानात अन्नधान्य व्यवस्थित मिळते का?
ग्रामसभेतील नागरिकांची भूमिका
- प्रश्न विचारण्याची तयारी करून जा. What is Gram Sabha
- सर्व खर्चाचे हिशेब पारदर्शकपणे तपासा.
- विकासकामांचा दर्जा तपासा.
- भ्रष्टाचार दिसल्यास त्वरित नोंद घ्या.
👉 लक्षात ठेवा – ग्रामसभा ही केवळ औपचारिकता नाही, तर गावकऱ्यांच्या हातातलं सर्वात ताकदवान शस्त्र आहे.
युवकांची जबाबदारी
आजची पिढी शहरात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाते. पण आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. म्हणून –
- युवकांनी ग्रामसभेत उपस्थित राहणं बंधनकारक केलं पाहिजे.
- सोशल मीडियाद्वारे जागरूकता पसरवली पाहिजे.
- गावातील विकास आराखड्यावर सुझाव दिले पाहिजेत.
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२५-२६ | कृषी यंत्रीकरण उपअभियान मार्गदर्शक सूचना स्पष्ट
What is Gram Sabha ग्रामसभा ही लोकशाहीचा पाया आहे. आपल्या गावाचा विकास, पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यासाठी प्रत्येक नागरिकाने ग्रामसभेत सहभागी होऊन योग्य प्रश्न विचारले पाहिजेत.
👉 पुढच्या वेळी ग्रामसभा असेल तेव्हा फक्त उपस्थित राहू नका, तर प्रश्न विचारायला विसरू नका!