Pink bollworm control in cotton 2025 : कापसावरील गुलाबी, हिरवी आणि ठिपक्यांची बोंड अळी नियंत्रण – संपूर्ण मार्गदर्शक 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Pink bollworm control in cotton 2025 “कापसावरील गुलाबी बोंड अळी, हिरवी बोंड अळी व ठिपक्यांची बोंड अळी या किडींमुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होतं. त्यांची लक्षणं आणि प्रभावी नियंत्रणासाठी योग्य फवारणी कोणती हे जाणून घ्या.”

कापूस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं महत्त्वाचं नगदी पीक आहे. परंतु या पिकावर बोंड अळी (Bollworm) या किडींचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांना दरवर्षी कोट्यवधींचं नुकसान होतं.

मुख्यतः तीन प्रकारच्या अळ्या कापसावर आढळतात:

  1. हिरवी बोंड अळी (Spotted Bollworm)
  2. ठिपक्यांची बोंड अळी (Spotted Bollworm)
  3. गुलाबी बोंड अळी (Pink Bollworm)

या किडींवर वेळेवर व योग्य व्यवस्थापन केल्यास मोठं नुकसान टाळता येऊ शकतं.

हिरवी बोंड अळीची लक्षणं

  • लहान अळ्या पात्या व कळ्यांचं नुकसान करतात. Pink bollworm control in cotton 2025
  • मोठ्या अळ्या बोंडांना छिद्र पाडून आतील भाग खाऊन टाकतात.
  • अळीचा अर्धा भाग अनेकदा बोंड्याच्या बाहेर दिसतो.
  • छिद्रे मोठी व अनियमित असतात.
  • पावसामुळे किडलेली बोंडे व पात्या सडतात.
Pink bollworm control in cotton 2025

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा

ठिपक्यांची बोंड अळीची लक्षणं

  • पेरणीनंतर एका महिन्यात पिकाच्या शेंड्यात प्रवेश करते.
  • कळ्या, फुले आणि बोंडांना पोखरून खाते.
  • प्रादुर्भावामुळे पात्या अर्धवट उमलतात व गळून पडतात.
  • शेंडे सुकतात आणि वाळतात. Pink bollworm control in cotton 2025

गुलाबी बोंड अळीची लक्षणं

  • याला सेंद्री बोंड अळी असेही म्हणतात.
  • शेंड्यांना न पोखरता थेट कळ्या, फुले व हिरवी बोंडे खातात.
  • प्रादुर्भावग्रस्त फुले “अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळी”सारखी दिसतात.
  • अळी आत शिरल्यानंतर छिद्र बंद होतं.
  • बोंडात एकापेक्षा जास्त अळ्या असू शकतात.
  • रुईचं प्रत व तेलाचं प्रमाण घटतं.
  • बियाण्याची उगवणक्षमता कमी होते.

प्रादुर्भाव ओळखण्याची पद्धत

  • देशी कापसावर 20 बोंडांपैकी 2 बोंड छिद्रित दिसल्यास प्रादुर्भाव गंभीर समजावा.
  • सलग 3 दिवस 5 ते 8 पतंग सापळ्यात अडकले तर किडीची पातळी गाठली असे मानले जाते.

👉 ICAR – Central Institute for Cotton Research (CICR)

हिरवी व ठिपक्यांची बोंड अळीवर नियंत्रण

शिफारस केलेली रासायनिक फवारणी

  • फ्लुबेंडामाईड 39.35% SC – 150 मिली/हेक्टर
  • इंडोक्साकार्ब 14.5% SC – 500 मिली/हेक्टर
  • स्पिनोसाड 45% SC – 200 मिली/हेक्टर Pink bollworm control in cotton 2025

👉 हे कीटकनाशके 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2025 | 7वा हप्ता खात्यात जमा | FTO तपासा | शेतकरी अपडेट

गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण

जैविक उपाय

  • ट्रायकोग्राम टोइडिया ब्रॅकटी – 60,000/एकर प्रमाणे सोडावेत.

रासायनिक उपाय

  • प्रोफेनोफॉस 50% EC – 1500 मिली/हेक्टर
  • इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG – 250 ग्रॅम/हेक्टर
  • इंडोक्साकार्ब 14.5% SC – 500 मिली/हेक्टर
  • क्लोरपायरीफॉस 20% EC – 1250 मिली/हेक्टर
  • क्विनालफॉस 25% EC – 2000 मिली/हेक्टर

👉 500 लिटर पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून फवारणी करावी. Pink bollworm control in cotton 2025

महत्त्वाच्या सूचना

  • एकाच कीटकनाशकाची सलग 2 पेक्षा जास्त वेळा फवारणी करू नये.
  • फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
  • फवारणी करताना मास्क, हातमोजे व गॉगल्स वापरावेत.
  • रसायनांच्या शिफारसी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी केलेल्या आहेत.

👉 CIBRC – Central Insecticides Board

समन्वित कीड व्यवस्थापन (IPM)

  • फेरोमोन सापळ्यांचा वापर करा.
  • शेतात पक्षीथांब्या बसवा.
  • वेळेवर निंदण करून पिकाला हवा व प्रकाश मिळू द्या.
  • रोगट व किडग्रस्त झाडं काढून नष्ट करा. Pink bollworm control in cotton 2025

सोने-चांदीच्या किंमतीत प्रचंड वाढ गुंतवणूकदार व सामान्य जनतेवर काय परिणाम?

कापूस पिकावर येणाऱ्या हिरवी, ठिपक्यांची आणि गुलाबी बोंड अळी या किडींचा प्रादुर्भाव वेळेवर नियंत्रणात आणणं अत्यंत गरजेचं आहे.

  • लक्षणं ओळखा
  • शिफारस केलेली औषधं वापरा
  • जैविक उपाय जोडा

Pink bollworm control in cotton 2025 यामुळे पिकाचं नुकसान टाळता येईल आणि शेतकऱ्यांना चांगला उत्पन्न मिळेल.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment