Paus Andaj राज्यात थंडी कमी झालेली आहे. अनेक भागात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज दिला. तसेच आणखी काही दिवस थंडी कमीच राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
Paus Andaj
कोठे कसा राहील पाऊस
हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला.
👉आजच जाणून घ्या आपल्या भागात पाऊस पडेल का?👈
तर रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
हे ही पाहा : खिशात रुपया नाहीये आणि बिझनेस सुरु करायचाय? जाणून घ्या लोन देणाऱ्या खास योजना
मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच आज काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
Paus Andaj हवामान विभागाने उद्याही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात विजांसह हलक्या पावासाच येलो अलर्ट देण्यात आला. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
हे ही पाहा : किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज