mahadbt marathi राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना सुरू आहेत, जेणेकरून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना व्हावा यातील एक कृषी यांत्रिकीकरण योजने बद्दलची माहिती आपण संविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ही योजना केंद्रपुरस्कृत योजना असून यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे. या योजने मध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.
mahadbt marathi
उदा. ट्रॅक्टर, पॉवर टीलर, स्वयंचलित औजारे उदा.रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड), ट्रॅक्टर चलीत औजारे उदा. रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे उदा.मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर. अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकरी यांना सरकारकडून अनुदान दिले जाते.
अनुदान किती टक्के मिळते?
अल्प व अत्यल्प भुधारक,अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी यांना 50 टक्के अनुदान मिळते आणि इतर शेतकरी यांना 40 टक्के अनुदान मिळते. मात्र राईस मिल, दाल मिल , पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशर च्या बाबतीतअल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा याना 60 टक्के व इतर लाभार्थी यांना 50 टक्के अनुदान आहे. अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहित धरण्यात येत नाही. त्याच प्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी 40 टक्के, 24 लाख रु. पर्यंत अनुदान मिळते.
हे ही पाहा : ‘Hi’ टाईप करा, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज झटपट खात्यात!
आवश्यक कागदपत्रे कोणती?
7/12 व 8 अ
बँक पास बुक
आधार कार्ड
यंत्राचे कोटेशन
परिक्षण अहवाल
जातीचा दाखला
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
अर्ज कुठे करावा?
mahadbt marathi अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे. शेतकरी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर त्याचप्रमाणे सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र येथे ही हा अर्ज भरु शकतात. या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडायचा आहे. शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे. आणि त्यानंतर लॉगइन करुन आपल्याला आवश्यक असणारे घटक यासाठी अर्ज करायचा आहे. अर्जासाठी रु.20 व जीएसटी रु.3.60 असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे आहे.
हे ही पाहा : पशु किसान क्रेडिट योजना कर्ज काढा जनावरे घ्या
लाभार्थी निवड कशी केली जाते?
संगणकीय प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जाते. निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येईल. ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा. त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाची नवीन योजना
शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर पाठवला जातो. शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध होइल. पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन पाहू शकतील.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024