kranti jyoti bal sangopan yojana सोशल मीडियावर वायरल झालेली मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही फेक आहे. जाणून घ्या खरी योजना कोणती आहे आणि कोण पात्र आहे. अधिकृत GR लिंकसह.
kranti jyoti bal sangopan yojana
सोशल मीडियावर वायरल झालेली मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही फेक आहे. जाणून घ्या खरी योजना कोणती आहे आणि कोण पात्र आहे. अधिकृत GR लिंकसह.

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
फेक मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना काय आहे?
kranti jyoti bal sangopan yojana अलीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट वायरल झाली आहे, ज्यात म्हटलं जातं की 1 मार्च 2020 नंतर पालकांचा मृत्यू झालेल्या 18 वर्षांखालील मुलांना महाराष्ट्र सरकार दरमहिना 4000 रुपये देणार आहे. इचलकरंजीच्या एका शाळेच्या शिक्क्याने ही पोस्ट अधिक विश्वासार्ह वाटू लागली होती.
पण वास्तविकता अशी आहे की महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. महाराष्ट्र शासनाने असा कोणताही जीआर काढलेला नाही.
हे ही पाहा : “शेतकऱ्यांची कर्जमाफी 2025: आश्वासन की फसवणूक? जाणून घ्या सविस्तर”
फेक योजनेचा उगम
kranti jyoti bal sangopan yojana ही योजना मध्यप्रदेश राज्यातील “मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना” आहे. तिथे अशा प्रकारे मदतीची तरतूद आहे. मात्र महाराष्ट्रात अशी योजना अस्तित्वात नाही. इचलकरंजी येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी चुकीची माहिती देत पालकांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
या प्रकारामुळे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार गेली आणि त्यातून ही गोष्ट उघडकीस आली.
महाराष्ट्रातील खरी योजना कोणती?
महाराष्ट्रात अशीच एक योजना अस्तित्वात आहे –

👉स्वस्त धान्य दुकानासाठी अर्ज सुरू! या जिल्ह्यांसाठी मोठी संधी👈
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना
GR तारीख: 30 मे 2023
kranti jyoti bal sangopan yojana या योजनेचा उद्देश आहे 0 ते 18 वयोगटातील संकटग्रस्त बालकांना दरमहा आर्थिक सहाय्य देणे.
पात्रता:
- अनाथ बालके
- ज्यांच्या दोन्ही किंवा एक पालक मृत आहेत
- घटस्फोट, विभक्तीकरण झालेल्या कुटुंबातील बालके
- बेघर, निराधार, दुर्धर आजार असलेल्या पालकांची मुले
- HIV, कॅन्सरग्रस्त पालकांची मुले
- तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या पालकांची मुले
- 40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली बालके
- अंध, दिव्यांग, भिक्षा मागणारी बालके
लाभ:
- पात्र बालकांना दरमहा 2250 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज करण्याची माहिती आणि तपशील मूल GR मध्ये नमूद आहेत.
- अधिकृत GR येथे वाचा: https://womenchild.maharashtra.gov.in

हे ही पाहा : महाराष्ट्र सरकारचे नवीन कुटुंब निवृत्ती वेतनधारक ID कार्ड 2025 – अर्ज, पात्रता व सर्व माहिती
निष्कर्ष:
- सोशल मीडियावर वायरल झालेली मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना फेक आहे.
- अशी योजना फक्त मध्यप्रदेशात आहे, महाराष्ट्रात नाही. kranti jyoti bal sangopan yojana
- महाराष्ट्रात अस्तित्वात असलेली खरी योजना म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना.
- कोणत्याही योजनेवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत GR, वेबसाइट आणि खात्यांकडूनच माहिती घ्या.