Interest Free Loan : केंद्र सरकारची सीजीटीएमएससी अंतर्गत क्रेडिट गॅरंटी मर्यादा 5 कोटीवरून 10 कोटीवर वाढली – उद्योगासाठी मोठा फायदा!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Interest Free Loan उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आधीच चालू असलेल्या व्यवसायाला वाढवायचा विचार करत असाल, तर कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी घेणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. परंतु बँकांकडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारी कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे जमिन किंवा प्रॉपर्टी अनेकांना उपलब्ध नसते. यामुळे अनेक लहान-मोठ्या उद्योजकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.

परंतु आता केंद्र सरकारच्या “Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises (CGTMSE/सीजीटीएमएससी)” योजनेत एक मोठी अपडेट झाली आहे. जी आपल्या उद्योगासाठी खूपच उपयुक्त आहे. ही योजना आता फक्त 5 कोटींच्या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी देत नव्हे तर ती मर्यादा दुप्पट वाढवून 10 कोटी रुपये पर्यंत केली गेली आहे. या लेखामध्ये आम्ही या योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर देणार आहोत.

Interest Free Loan

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

सीजीटीएमएससी म्हणजे काय?

Interest Free Loan सीजीटीएमएससी ही एक केंद्र सरकारची संस्था आहे जी सूक्ष्म आणि लहान उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी देते. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे बँक कर्जासाठी तारण म्हणून कोलॅटरल नसेल, तरी ही संस्था बँकेला तुमच्या कर्जाची जबाबदारी घेते. त्यामुळे तुम्हाला कर्ज अर्ज प्रक्रिया सोपी होते.

क्रेडिट गॅरंटीची मर्यादा वाढवण्यामागचे कारण

18 मार्च 2025 रोजी प्रकाशित सर्कुलर नुसार, यापूर्वी सीजीटीएमएससी पाच कोटींपर्यंत कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी देत होती. पण आता, उद्योगांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन, ही मर्यादा दहा कोटी रुपये पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमनी यांनी आपल्या अर्थसंकल्प भाषणातही या बदलाचा उल्लेख केला होता.

हे ही पाहा : 2025 मधील टॉप 5 सरकारी व्यवसाय कर्ज योजनांबद्दल सर्व माहिती

कोणत्या प्रकारच्या कर्जांसाठी क्रेडिट गॅरंटी मिळते?

  • टर्म लोन: उद्योग सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी दीर्घकालीन कर्ज.
  • वर्किंग कॅपिटल लोन: उद्योग चालवण्यासाठी चालू खर्च, कच्चा माल खरेदी यासाठी दिले जाणारे कर्ज.

Interest Free Loan महत्त्वाचे म्हणजे, हे क्रेडिट गॅरंटी फक्त व्यवसाय कर्जासाठीच आहे, हाउसिंग लोन, पर्सनल लोन यासाठी नव्हे.

क्रेडिट गॅरंटी फी चार्ज कशी होते?

सीजीटीएमएससी कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी देताना, कर्जदाराकडून वार्षिक काही फी घेतली जाते. ही फी कर्जाच्या रकमेवर आधारित असते. पुढील चार्टमध्ये फीजची रक्कम दिलेली आहे:

कर्ज रक्कमवार्षिक गॅरंटी फी दर
10 लाखांपर्यंत0.37%
10 ते 50 लाख0.5%
50 लाख ते 1 कोटी0.6%
1 कोटी ते 2 कोटी0.85%
2 कोटी ते 5 कोटी1.0%
5 कोटी ते 8 कोटी1.10%
8 कोटी ते 10 कोटी1.20%

Interest Free Loan ही फी प्रत्येक वर्ष कर्ज बॅलन्सवर लागू केली जाते.

👉आताच करा योजनेचा ऑनलाइन अर्ज👈

कर्ज कसे मिळवायचे? अर्ज प्रक्रिया काय आहे?

Interest Free Loan सर्वात महत्वाचा प्रश्न असा की, कर्ज अर्ज प्रक्रिया कुठे करायची?
उत्तर: तुम्हाला स्वतंत्रपणे सीजीटीएमएससी कडे अर्ज करण्याची गरज नाही. बँकेत तुम्ही जसे नेहमी कर्जासाठी अर्ज करता तसेच करायचा आहे. जर तुमच्याकडे कोलॅटरल नसेल, तर बँक स्वतः सीजीटीएमएससी कडे तुमच्या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी अर्ज करते.

पूर्ण कर्ज किंवा अंशतः कर्जासाठी गॅरंटी

  • जर बँकेत तुम्ही 1 कोटीचा कर्जाचा अर्ज केला, आणि कोलॅटरल सिक्युरिटीची व्हॅल्यू 60 लाख इतकी आहे, तर
  • 60 लाख रुपयासाठी कोलॅटरल दिले जाईल आणि उर्वरित 40 लाखासाठी सीजीटीएमएससी कडून क्रेडिट गॅरंटी मिळेल.

म्हणून हे कर्ज पूर्ण किंवा अंशतः क्रेडिट गॅरंटी योजनेसाठी उपयुक्त आहे.

हे ही पाहा : “शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना: गाय गोठा व शेळीपालन अनुदान योजनेचे फायदे”

विनाकारण कर्ज खरंच मिळते का?

Interest Free Loan सर्वांना विनाकारण कर्ज मिळत नाही, हे समजून घ्या.

  • ज्यांचे आधीपासून उद्योग आहे,
  • ज्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे,
  • ज्यांनी वेळेवर कर्जाची हप्ते दिली आहेत, अशा उद्योजकांना या योजनेचा फायदा मिळतो.

नवीन उद्योजकांसाठी ही योजना सुरुवातीला कमी रक्कमासाठी कदाचित लागू होऊ शकते. परंतु चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार केल्यानंतर वाढीव कर्जासाठी ही मदत होते.

महत्वाचे मुद्दे आणि सल्ला

  • उद्योगाला कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी वापरून बँकेत अर्ज करा.
  • तुमची क्रेडिट हिस्ट्री व्यवस्थित ठेवा.
  • बँकेशी नियमित संपर्क ठेवा, आणि वेळेवर कर्ज हप्ते भरा.
  • कोलॅटरल सिक्युरिटी नसेल तर देखील सीजीटीएमएससी क्रेडिट गॅरंटी तुमची मदत करेल.
  • फीज चार्ज आणि इतर शर्ती नीट समजून घ्या.

हे ही पाहा : दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज

Interest Free Loan सीजीटीएमएससी अंतर्गत क्रेडिट गॅरंटीची मर्यादा 5 कोटी वरून दुप्पट होऊन 10 कोटी रुपये झाली आहे. ही योजना सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगांसाठी मोठी संधी आहे. तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा विस्तारायचा असेल तर हा एक प्रभावी मार्ग आहे ज्याद्वारे तुम्हाला कोलॅटरल शिवाय कर्ज सहज मिळू शकते.

यासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही, फक्त बँकेत जसे कर्जासाठी अर्ज करतो तसेच करा. बँक स्वतः तुमच्या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटीची प्रक्रिया सांभाळेल.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी CGTMSE ची अधिकृत वेबसाइट भेट द्या.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment