farmer loan waiver flood compensation महाराष्ट्रात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विरोधी पक्षाने विशेष अधिवेशनाची मागणी केली असून शरद पवारांनी पंचनामे, कर्जमाफी, पीकविमा व पुनर्जीवन कार्यक्रमाबाबत 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण माहिती जाणून घ्या.
जय शिवराय मित्रांनो 🙏, गेल्या काही दिवसांत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान हे न भरून निघण्यासारखे झाले आहे.
farmer loan waiver flood compensation
👉 शेतकरी संघटना, नागरिक व विरोधी पक्ष शासनाकडे मोठ्या प्रमाणात मागण्या करत आहेत:
- नुकसान भरपाई द्या
- संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा
- पुनर्जीवन कार्यक्रम राबवा
याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, तर शरद पवार साहेबांनी पाच ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत.
विरोधकांची मागणी – विशेष अधिवेशन का गरजेचे?
- शेतकऱ्यांचे प्रश्न थेट विधानसभेत मांडण्यासाठी
- लोकप्रतिनिधींना त्यांच्या भागातील परिस्थिती मांडता यावी म्हणून
- हेक्टरी ₹50,000 नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी यासाठी निर्णय व्हावा म्हणून
- आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाय ठरवण्यासाठी

या शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी
शरद पवारांच्या पाच महत्त्वाच्या सूचना
1. पंचनाम्यांना मुदतीचे बंधन नसावे
- सध्या नुकसान भरपाईसाठी ठराविक कालावधीत पंचनामे करावे लागतात.
- पूर ओसरल्यानंतर बर्याच भागात पंचनामे होत नाहीत व शेतकरी वंचित राहतात.
- त्यामुळे पंचनाम्यांना मुदतीचे बंधन नको असे पवारांचे मत आहे.
2. पुनर्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे
- पूरामुळे जमीन खरडून जाते, विहिरी गाळाने भरतात, बांधबंदी कोसळते.
- मनरेगाच्या माध्यमातून ही कामे करता येतील. farmer loan waiver flood compensation
- तसेच शाळा, रस्ते, आरोग्य केंद्रे, वीज पुरवठा यांचा पुनर्जीवन कार्यक्रम तयार करावा.
3. साहित्य व जनावरांसाठी मदत
- पूरस्थितीत नागरिकांचे कपडे, भांडी, संसारोपयोगी साहित्य वाहून जाते.
- जनावरांसाठी चारा व शेतकऱ्यांसाठी शेतीची साधने उपलब्ध करून द्यावीत.
- लहान व्यवसायिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनाही दिलासा द्यावा.
4. पीक विमा योजना सुलभ करणे
- खाजगी विमा कंपन्या दिरंगाई करतात, टाळाटाळ करतात.
- शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा लाभ मिळावा यासाठी पात्रतेचे निकष शिथिल करावेत.
- विमा रक्कम वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी. farmer loan waiver flood compensation
लहान मुलांचे केस अकाली पांढरे होण्याची कारणं आणि घरगुती उपाय
5. कर्जमाफी व मानसिक आधार
- शेतकरी व व्यावसायिकांच्या कर्जाची तात्पुरती वसुली थांबवावी.
- संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी – शेतकऱ्यांची मागणी. farmer loan waiver flood compensation
- आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्का बसतो, त्यामुळे समुपदेशन शिबिरे आयोजित करून आत्महत्यांचे प्रमाण थांबवावे.
नागरिक व शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- हेक्टरी ₹50,000 नुकसान भरपाई
- संपूर्ण कर्जमाफी
- पूरग्रस्तांसाठी तात्पुरती मदत
- फळबागांचे पुनर्जीवन
- पायाभूत सुविधांची दुरुस्ती
- पीक विमा रक्कम त्वरित खात्यात जमा
शासनाची भूमिका – पुढे काय होऊ शकते?
- केंद्र व राज्य शासनाकडून NDRF निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार.
- 5 ऑक्टोबर 2025 नंतर अंतिम मदतीची घोषणा होण्याची शक्यता.
- विशेष अधिवेशन बोलवले जाईल का? – याकडे सगळ्यांचे लक्ष. farmer loan waiver flood compensation
शेतकऱ्यांनी आत्ता काय करावे?
- पंचनामे योग्यरित्या नोंदले गेले आहेत का तपासा.
- फार्मर आयडी (AgriStack ID) असल्याची खात्री करा.
- KYC पूर्ण करा, जेणेकरून मदत थेट खात्यात जमा होईल.
- विमा कंपन्यांकडे दावा दाखल करताना पावत्या जतन ठेवा.
- आपल्या भागातील लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवा.
शेतकरी नुकसान भरपाई 2025 – प्रति हेक्टर दर, पंचनामा प्रक्रिया आणि शासन निर्णय
अधिकृत संकेतस्थळे
👉 महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (maharashtra.gov.in)
👉 महसूल व वन विभाग
farmer loan waiver flood compensation मित्रांनो, पूर व अतिवृष्टीमुळे राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ नुकसान भरपाईपुरते मर्यादित नसून कर्जमाफी, पुनर्जीवन, मानसिक आधार व पीक विमा यासारख्या बहुआयामी उपायांची गरज आहे.
👉 विरोधी पक्षाने विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे आणि शरद पवारांनी दिलेल्या पाच सूचना शासनासाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
आता शासनाने गांभीर्याने पावले उचलून शेतकरी व नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा देणे ही काळाची गरज आहे.