Disaster relief for farmers Maharashtra : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई 2025 – संपूर्ण मार्गदर्शक

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Disaster relief for farmers Maharashtra 2025 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची संपूर्ण माहिती. शेतकरी, फळबाग, पशुधन व घरांच्या नुकसानीसाठी शासन दराने मिळणारे दर जाणून घ्या.

मित्रांनो, ऑगस्ट 2025 महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून शेतजमिनी, फळबागा, घरे आणि पशुधन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 30 मे 2025 रोजी नवा शासन निर्णय (जीआर) काढला आहे. हा निर्णय 27 मार्च 2023 च्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणावर (NDRF Policy) आधारित आहे.

आज आपण या लेखातून शेतकऱ्यांना, पशुपालकांना व नागरिकांना मिळणारी नुकसान भरपाई किती आहे, त्याचे निकष काय आहेत हे समजून घेऊ.

पंचनामा प्रक्रिया आणि मुदत

  • नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे 30 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.
  • पंचनाम्यानंतर मिळणारी नुकसान भरपाई ही शासन निर्णयानुसार दिली जाईल. Disaster relief for farmers Maharashtra
  • मात्र अतिरिक्त नुकसान झाल्यास राज्य शासन अतिरिक्त मदत जाहीर करू शकते.

नुकसान भरपाईसाठी लागू असलेला शासन निर्णय

  • 27 मार्च 2023 चा जीआर राबविण्यात येत आहे.
  • त्याआधारे खरीप हंगाम 2025 पासून सर्व नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
  • पूर्वीचे अतिरिक्त मदत जीआर (3 हेक्टर मर्यादा, 13,600 रुपये/हेक्टरी) आता रद्द झाले आहेत.
  • सध्या लागू दरानुसार 2 हेक्टरपर्यंत आणि 8,500 रुपये/हेक्टरी इतकी मदत दिली जाते.

👉 अधिकृत जीआर लिंक: Maharashtra Government GR Portal

Disaster relief for farmers Maharashtra

जाणून घ्या खात्यात केव्हा जमा होणार नुकसान भरपाई

शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई

1. कोरडवाहू (जिरायत) शेती

  • ₹8,500 प्रति हेक्टर (कमाल 2 हेक्टरपर्यंत) Disaster relief for farmers Maharashtra
  • किमान मदत ₹1,000 पेक्षा कमी नसावी.

2. बागायत क्षेत्र

  • ₹17,000 प्रति हेक्टर
  • किमान मदत ₹2,000 पेक्षा कमी नसावी.

3. फळबागा (बहुवार्षिक पिके)

  • ₹22,500 प्रति हेक्टर
  • किमान मदत ₹2,500 पेक्षा कमी नसावी.

4. रेशीम शेती

  • मुलबेरी / टसर रेशीम: ₹6,000 प्रति हेक्टर
  • मुगा रेशीम: ₹5,500 प्रति हेक्टर

शेतीजमिनीचे इतर नुकसान

  • गाळ/वाळूचा थर साचल्यास: ₹18,000 प्रति हेक्टर
  • दरड कोसळून जमीन वाहून गेल्यास: ₹47,000 प्रति हेक्टर
  • किमान मदत ₹5,000 असावी. Disaster relief for farmers Maharashtra

पशुधन नुकसान भरपाई

  • गाई, म्हशी, उंट: ₹37,500
  • मेंढी, बकरी, डुकरे: ₹4,000
  • गाढव, शिंगरू, वासरू: ₹20,000
  • एक कुटुंबाला जास्तीत जास्त 3 मोठी दुधाळ जनावरे किंवा 6 लहान जनावरे यापेक्षा जास्त भरपाई नाही.

🐓 कुक्कुटपालन

  • कोंबडी: ₹100 प्रति कोंबडी
  • कुटुंबाला कमाल ₹10,000 मदत.

भजनी मंडळांसाठी महाराष्ट्र सरकारकडून ₹25,000 अनुदान – गणेशोत्सव आता राज्योत्सव!

घरांचे नुकसान

  • पक्के घर: ₹1,20,000
  • कच्चे घर: ₹1,30,000
  • घरातील भांडी खरेदीसाठी: ₹2,500 प्रति कुटुंब
  • कपड्यांसाठी: ₹2,500 प्रति कुटुंब

व्यक्तींचे नुकसान

  • आपत्तीमध्ये मृत्यू: ₹4 लाख (नातेवाईकांना)
  • अपंगत्व (40–60%): ₹74,000
  • अपंगत्व (60% पेक्षा जास्त): ₹2.5 लाख
  • दवाखान्यात दाखल –
    • 1 आठवड्यापेक्षा जास्त: ₹16,000
    • 1 आठवड्यापेक्षा कमी: ₹5,400

मत्स्य व्यवसाय नुकसान

  • मासेमारी व मत्स्यबीजाचे नुकसान झाल्यास शासनाने वेगळी मदत जाहीर केलेली आहे.
  • पशुधन छावण्यांसाठी चाऱ्याचा खर्च शासन उचलते. Disaster relief for farmers Maharashtra

शेतकऱ्यांचे सर्वसामान्य प्रश्न

  • 1. दोन हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर नुकसान झाले तर?
    • फक्त 2 हेक्टरपर्यंतचीच नुकसान भरपाई दिली जाते.
  • 2. एकापेक्षा जास्त योजना अंतर्गत मदत मिळेल का?
    • नाही. जर शेतकऱ्याने इतर योजनेतून मदत घेतली असेल तर ही मदत मिळणार नाही.
  • 3. पंचनाम्यात काय लक्षात घ्यावे?
    • खरीप लागवड किती आहे ते स्पष्ट असावे.
    • नुकसानाचे फोटो, अहवाल व कागदपत्रे जतन करावीत.

महत्वाचे मुद्दे

  • मदतीची रक्कम 33% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यासच मिळते.
  • जास्त नुकसान झाल्यास राज्य शासन विशेष मदत जाहीर करू शकते.
  • पंचनाम्यानुसार तयार झालेला प्रस्ताव शासनाला पाठवूनच मदत वितरित केली जाईल.

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी: वचन, वास्तव आणि शेतकऱ्यांची प्रतिक्षा

Disaster relief for farmers Maharashtra 2025 च्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी, फळबागधारक, पशुपालक व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने 27 मार्च 2023 च्या धोरणानुसार व 30 मे 2025 च्या जीआरनुसार नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून कागदपत्रे सादर केली पाहिजेत.

👉 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: Maharashtra Disaster Management Portal

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment