Cotton disease management guide : कापूस पिकातील किड व रोग व्यवस्थापन 2025 – शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Cotton disease management guide कापूस पिकातील मर रोग, करपा, पांढरी माशी, तुडतुडे व मावा अशा किड-रोगांचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा आणि त्यावर प्रभावी नियंत्रण कसं करायचं? जैविक व रासायनिक उपायांसह शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक.

मागील काही दिवसांपासून कापूस उत्पादक पट्ट्यात सतत पावसामुळे विविध किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

  • पांढरी माशी, तुडतुडे, मावा यांसारख्या रसशोषक किडींचा धोका वाढला आहे.
  • मर रोग व करपा यांसारखे बुरशीजन्य रोगही वाढत आहेत.

Cotton disease management guide या रोग-किडींची लक्षणं दिसताच त्वरित नियंत्रण करणं आवश्यक आहे. अन्यथा उत्पादनात मोठी घट होऊ शकते.

कपाशीतील मर रोग (Sudden Wilt Disease)

🟢 मर रोग का होतो?

  • शेतात पाणी साचणं
  • अचानक उन्हामुळे निर्माण होणारा ताण
  • मुळाभोवती क्षार जमा होणं
  • पाणीपुरवठ्याचा तुटवडा

🟢 लक्षणं

  • पानांचा रंग फिकट किंवा पिवळसर
  • पाने वाळलेली दिसतात
  • मुळे काळसर होतात
  • फुलोऱ्याच्या काळात झाडं मरतात
Cotton disease management guide

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा

🟢 नियंत्रण उपाय

  1. पाणी निचरा: शेतात साचलेलं पाणी लगेच काढून टाका.
  2. आंतरमशागत: माती हलकी करून हवा खेळती ठेवा.
  3. औषधोपचार:
    • 100 लिटर पाण्यात कॉपर ऑक्सीक्लोराईड 250 ग्रॅम + युरिया 2 किलो मिसळून आळवणी करा.
    • मुळाजवळ 100 मिली द्रावण द्या. Cotton disease management guide
    • पिकाच्या बुंध्याजवळ माती चढवा.
  4. फवारणी:
    • कार्बेंडाझीम 50% WP (10 ग्रॅम) + मॅन्कोझेब 75% WP (25 ग्रॅम) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.

करपा रोग (Leaf & Boll Spot Disease)

लक्षणं

  • पानांवर व बोंडांवर गोलसर तपकिरी/विटकरी ठिपके
  • पानं कोरडी वगळतात
  • उत्पादन घटते

नियंत्रण

  • पायरोक्लोस्ट्रोबिन 20% WG – 10 ग्रॅम किंवा
  • मेटेराम 55% + पायरोक्लोस्ट्रोबिन 5% WG – 20 ग्रॅम
  • 10 लिटर पाण्यात मिसळून 10–15 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या करा. Cotton disease management guide

पांढरी माशी (Whitefly)

लक्षणं

  • पानांच्या खालच्या बाजूस प्रौढ व पिल्ले दिसतात
  • पाने पिवळसर व चिकट होतात
  • अन्ननिर्मितीची प्रक्रिया थांबते
  • झाडांची वाढ खुंटते, फुले गळतात

जिओचा ग्राहकांना मोठा धक्का! सर्वात लोकप्रिय ₹249 चा प्लॅन बंद, रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार

नियंत्रण

  1. भौतिक उपाय:
    • पिवळे चिकट सापळे शेतात लावा.
  2. जैविक उपाय:
    • 5% निंबोळी अर्क (50 मिली/10 लिटर पाणी) फवारणी करा.
    • वर्टिसिलियम लेकॅनी (40 ग्रॅम/10 लिटर पाणी) फवारणी करा.
  3. रासायनिक उपाय:
    • बुफ्रोफेझिन 25% EC – 20 मिली
    • डायफेनथ्युरॉन 50% WP – 12 ग्रॅम
    • थायोमेथोक्झाम 25% WG – 2 ग्रॅम

मावा, तुडतुडे व फुलकिडे

लक्षणं

  • पानं वाकडी-तिडकी
  • कळ्या व फुलं गळतात
  • झाडांच्या वाढीत अडथळा

नियंत्रण

  1. आंतरमशागत व तणनियंत्रण करा.
  2. खत व्यवस्थापन: नत्र खत योग्य प्रमाणात द्या. Cotton disease management guide
  3. जैविक उपाय:
    • निळे चिकट सापळे (10–12 प्रति हेक्टर) लावा.
    • ढाळ किडा (Chrysoperla) सारख्या मित्र कीटकांचे संवर्धन करा.
    • 5% निंबोळी अर्क किंवा अझाडरेक्टीन 300 PPM (50 मिली/10 लिटर पाणी) फवारणी करा.
  4. रासायनिक उपाय:
    • फ्लोनिकॅमिड 50% WG – 3 ग्रॅम
    • टॅफ्लेन पायराड 15 EC – 20 मिली
    • ब्युफ्रोफेझिन 25 SC – 20 मिली

शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या टिप्स

  • शेतात पाणी साचू देऊ नका.
  • पीक तणरहित ठेवा.
  • संतुलित खत व्यवस्थापन करा.
  • जैविक नियंत्रणाला प्राधान्य द्या.
  • आवश्यक असल्यासच रासायनिक फवारणी करा.

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा योजना) २०२५ – शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन

अधिकृत संदर्भ लिंक

Cotton disease management guide कापूस पिकातील किड व रोग व्यवस्थापनासाठी संतुलित शेती पद्धती, योग्य वेळी औषधोपचार आणि जैविक उपाय हे फार महत्वाचे आहेत.

  • मर रोग, करपा, पांढरी माशी, तुडतुडे, मावा यावर वेळेवर उपाय केल्यास उत्पादनात घट होत नाही.
  • शेतकऱ्यांनी फक्त आवश्यकतेनुसार रासायनिक औषधं वापरावी आणि नैसर्गिक उपायांना प्राधान्य द्यावे.
WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment