Anti Hail Net Scheme 2025 Maharashtra डाळिंब बागेसाठी अँटी हेलनेट कव्हर योजनेत 50% अनुदान कसे मिळेल? ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे, पात्रता निकष आणि अधिकृत MahaDBT लिंक येथे जाणून घ्या.
महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने अँटी हेलनेट कव्हर योजना सुरू केली आहे.
Anti Hail Net Scheme 2025 Maharashtra
- 2023 मध्ये याचा जीआर (Government Resolution) निर्गमित करण्यात आला.
- एकात्मिक फलोत्पादन योजनेच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते.
- डाळिंब बागांना 50% अनुदानावर प्लास्टिक आच्छादन (Anti Hail Net Cover) दिले जाते.
👉 अधिकृत संकेतस्थळ: MahaDBT Farmer Portal
अँटी हेलनेट कव्हर म्हणजे काय?
- डाळिंब बागेला लावलेले प्लास्टिक आच्छादन.
- गारपीट, अवकाळी पाऊस, उष्णतेमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपयोगी.
- फळांचे नैसर्गिक आपत्तीपासून 100% संरक्षण.
- फलोत्पादन क्षेत्रात महत्वाचा घटक मानला जातो.
अनुदान किती मिळते?
- शासनाच्या नियमानुसार 50% अनुदान दिले जाते.
- दर: ₹105 प्रति चौ. मीटर.
- प्रति शेतकरी जास्तीत जास्त 4000 चौ. मीटर (1 एकर) पर्यंत लाभ.
- म्हणजेच शेतकऱ्यांना एक एकर बागेसाठी 50% खर्च शासन उचलते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा
पात्रता निकष
- शेतकऱ्याकडे डाळिंब बाग नोंद असलेली हवी.
- सातबारा (7/12) उताऱ्यावर डाळिंब लागवड नोंद असावी.
- EPIC पाहणी झालेली असावी. Anti Hail Net Scheme 2025 Maharashtra
- बाग किमान 20 गुंठ्यांपासून ते 1 एकर पर्यंत असावी.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Step by Step)
Step 1: पोर्टलवर लॉगिन करा
- MahaDBT Portal उघडा.
- Farmer ID + OTP टाकून लॉगिन करा.
- आपला प्रोफाईल 100% पूर्ण भरलेला असावा.
Step 2: घटक निवडा
- Anti Hail Net Scheme 2025 Maharashtra “घटकासाठी अर्ज करा” वर क्लिक करा.
- फलोत्पादन (Horticulture) विभाग निवडा.
- “फळबाग लागवड योजना” अंतर्गत क्रॉप कव्हर (Crop Cover) निवडा.
- त्यात अँटी हेलनेट कव्हर (Anti Hail Net Cover) निवडा.
Step 3: साईज निवडा
- उपलब्ध पर्याय: 1000, 2000, 3000, 4000 चौ. मीटर.
- 2000 चौ. मीटर (20 गुंठे) ते 4000 चौ. मीटर (1 एकर) पर्यंत अर्ज करू शकता.
- निवड करून बाब जतन (Save Draft) करा.
धाराशीव शेतकऱ्यांना दिलासा! खरीप 2024 चा प्रलंबित पीक विमा खात्यात जमा सुरू
Step 4: अर्ज सादर करा
- अर्ज सादर करताना “अटी व शर्ती मान्य” टिक करा.
- ₹23.60 ऑनलाईन पेमेंट करा (Processing Fee).
- पेमेंट पूर्ण झाल्यावर अर्ज सबमिट होईल.
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड Anti Hail Net Scheme 2025 Maharashtra
- सातबारा उतारा (7/12) – डाळिंब बाग नोंदीसह
- EPIC पाहणी रिपोर्ट
- बँक पासबुक झेरॉक्स
- मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
अर्जानंतर पुढील प्रक्रिया
- अर्ज “वेटिंग लिस्ट” मध्ये दाखवला जातो.
- लॉटरी (सोडत) झाल्यानंतर निवड झाल्यास SMS येईल.
- त्यानंतर शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्याची सूचना दिली जाईल.
- पात्र शेतकऱ्यांना अनुदान थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे मिळेल.
शेतकऱ्यांचे सामान्य प्रश्न (FAQ)
- ❓ अनुदान किती मिळेल?
- ✅ एकूण खर्चाच्या 50% पर्यंत, जास्तीत जास्त 4000 चौ. मीटर साठी.
- ❓ प्रोसेसिंग फी किती आहे? Anti Hail Net Scheme 2025 Maharashtra
- ✅ ₹23.60 ऑनलाईन पेमेंट.
- ❓ कोणती बाग पात्र ठरते?
- ✅ सातबारा उताऱ्यावर डाळिंबाची नोंद असलेली बाग.
- ❓ अर्ज कुठे करायचा?
- ✅ MahaDBT Farmer Portal वर.
महाराष्ट्र शासनाची दूध गाई-म्हैस खरेदी अनुदान योजना 2025 संपूर्ण माहिती
Anti Hail Net Scheme 2025 Maharashtra मित्रांनो, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी अँटी हेलनेट कव्हर योजना ही फार महत्वाची आहे. गारपीट, अवकाळी पाऊस व उन्हाळ्याच्या झळांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे प्लास्टिक आच्छादन आवश्यक आहे.
शासन या योजनेतून 50% अनुदान देत आहे. त्यामुळे अजून अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित MahaDBT Farmer Portal वर लॉगिन करून अर्ज करावा.
Anti Hail Net Scheme 2025 Maharashtra यामुळे तुमच्या डाळिंब बागेला सुरक्षितता मिळेल आणि उत्पादनही वाढेल.
