Aaple Sarkar Center Application 2025 : “अमरावती जिल्ह्यात 312 नवीन आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज सुरु – पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती!”

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Aaple Sarkar Center Application अमरावती जिल्ह्यात 312 नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु! पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, आणि मुलाखतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 जुलै 2025.

आपल्या माहिती केंद्र चॅनेलतर्फे एक अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासमोर आणत आहोत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत 312 नवीन आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा, कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत.

Aaple Sarkar Center Application

👉आताच करा ऑनलाइन अर्ज👈

अर्ज करण्याची तारीख व ठिकाण

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 23 जून 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 7 जुलै 2025
  • अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती
  • अर्ज करण्याची वेळ: कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी 10 ते संध्या 5)

एकूण रिक्त जागा

Aaple Sarkar Center Application अर्ज मागवण्यात आलेल्या 312 जागा खालीलप्रमाणे आहेत:

क्षेत्रजागा
ग्रामीण (ग्रामपंचायत)261
महानगरपालिका51
एकूण312

हे ही पाहा : कमी शिक्षण, कमी पैशांमध्ये सुरू होणारे 5 जबरदस्त व्यवसाय – 2025 साठी योग्य!

पात्रता व अटी (Eligibility Criteria)

  • ✅ वय मर्यादा:
    • अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे.
  • ✅ शैक्षणिक पात्रता:
    • कोणतीही पदवी उत्तीर्ण असावी.
    • MSCIT किंवा CCGC प्रमाणपत्र आवश्यक.
  • ✅ भाषेचे ज्ञान:
    • मराठी व इंग्रजी भाषेचे कार्यक्षम ज्ञान आवश्यक.
  • ✅ तांत्रिक अटी:
    • स्वतःच्या नावावर पॅन कार्ड व आधार कार्ड अनिवार्य.
    • CSC (Common Service Center) असल्यास प्राधान्य.
  • ✅ अर्ज मर्यादा:
    • फक्त एका क्षेत्रासाठी (ग्रामीण/महानगरपालिका) अर्ज करता येईल.
    • विवाहित स्त्रियांनी विवाहपूर्व व विवाहोत्तर वेगळ्या नावाने अर्ज करू नयेत.

👉नवीन आपले सरकार सेवा केंद्राचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज प्रक्रिया

📋 अर्ज नमुना:

Aaple Sarkar Center Application अर्जामध्ये खालील माहिती भरायची आहे:

  • अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल, ईमेल
  • शैक्षणिक माहिती (पदवी, MSCIT)
  • सीएससी अस्तित्वात आहे का?
  • पॅन कार्ड व आधार क्रमांक
  • बँक तपशील: खाते क्रमांक, आयएफएससी कोड
  • सेवा केंद्राचे स्थान: स्वतःचे / भाड्याचे
  • स्थानिक रहिवाशी पुरावा (ग्रामपंचायत दाखला, मतदान कार्ड, लाईट बिल इ.)

🔗 अर्ज नमुना व अधिकृत माहिती पाहा येथे

हे ही पाहा : जिल्हा रुग्णालय सातारा भरती 2025 – ICTC लॅब टेक्निशियन पदासाठी जबरदस्त संधी

आवश्यक कागदपत्रांची यादी

  1. पॅन कार्ड व आधार कार्ड
  2. पदवी प्रमाणपत्र
  3. MSCIT / CCGC प्रमाणपत्र
  4. सीएससी परवानगी पत्र (असल्यास)
  5. बँकेचे पासबुक
  6. रहिवासी पुरावा (2 पैकी कोणतेही)
  7. पोलीस खात्याकडून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
  8. भाडे करारपत्र (भाड्याची जागा असल्यास)

निवड प्रक्रिया व गुणांकन

Aaple Sarkar Center Application मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. यामध्ये गुणांचे वाटप पुढीलप्रमाणे होईल:

निकषगुण
पदवीधर30
पदव्युत्तर25
CSC चालू केंद्र25
जिल्हा समिती मुलाखत20

📌 2018 च्या शासन निर्णयातील अटी बंधनकारक राहतील.

हे ही पाहा : लखपती बनवणारी मॅग्नेटिक डिस्टोनर मशिन – शेतकऱ्यांसाठी मोठी कमाईची संधी!

स्थानिक अर्जदारांना प्राधान्य

  • स्थानिक लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य.
  • एकाच गावातून एकहून अधिक अर्ज आल्यास मुलाखतीच्या आधारे निवड.
  • काही गावांत अर्ज न आल्यास शेजारील गावातील अर्ज ग्राह्य.

सेवा केंद्राची जागा

  • जागा स्वतःची असल्यास सातबारा/मिळकत पत्रक जोडणे आवश्यक.
  • भाड्याची जागा असल्यास भाडेकरार अनिवार्य.
  • अक्षांश/रेखांश (Latitude/Longitude) माहिती आवश्यक.

महत्त्वाचे टीप्स (Tips)

  • सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत आणि मूळ प्रत सोबत ठेवा.
  • अर्ज सहीसह पूर्ण भरून दिलेल्या वेळेत सादर करा.
  • माहितीची खातरजमा करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ नियमित पहात रहा.
  • विवाहानंतर नाव बदलले असल्यास, योग्य प्रमाणपत्र जोडावे. Aaple Sarkar Center Application

हे ही पाहा : “अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना”

अधिकृत लिंक आणि संदर्भ

🔗 अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय – अधिकृत वेबसाइट

Aaple Sarkar Center Application अमरावती जिल्ह्यातील युवकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज करण्याची ही सुवर्णसंधी आहे. दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करून, संपूर्ण अर्ज वेळेत भरावा. आपल्या यशासाठी शुभेच्छा!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment