Krishi Samruddhi Scheme 2024 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी २५,००० कोटींचा विकास प्रकल्प

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Krishi Samruddhi Scheme 2024 राज्यातील शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटींच्या तरतुदीसह कृषी समृद्धी योजना राबवली जाणार आहे. योजनेचे उद्दिष्ट, लाभ, मार्गदर्शक सूचना आणि अंमलबजावणी यांचा सविस्तर आढावा.

राज्य शासनाने २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी २५,००० कोटी रुपये निधीसह “कृषी समृद्धी योजना” राबवण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून एकाच छत्राखाली पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.

Krishi Samruddhi Scheme 2024

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

योजनेची गरज का भासली?

Krishi Samruddhi Scheme 2024 राज्यातील शेतकरी दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, कीड रोगट प्रादुर्भाव, भाव न मिळणं, पशुधनाचं नुकसान अशा संकटांना सामोरे जातात. विविध योजनांची माहिती एकत्र न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहतात.

कृषी समृद्धी योजना ही एक “एकछत्री योजना” असणार आहे – जी पायाभूत सुविधा, कृषी यांत्रिकीकरण, साठवणूक केंद्रे, पॉलीहाऊस, नर्सरी, मार्केट लिंकिंग या सर्व बाबी एकाच ठिकाणी घेऊन येईल.

योजनेचे प्रमुख उद्दिष्ट

  1. शेतकऱ्यांच्या शेतातील गरजांनुसार योजनांचा समावेश
  2. गावागावात पायाभूत सुविधा निर्माण करणे
  3. DBT (Direct Benefit Transfer) पोर्टलवर एकत्रित प्रक्रिया
  4. गव्हर्नन्स सुधारणा आणि योजना पोहोच सुनिश्चित करणे

हे ही पाहा : महाडीबीटी पोर्टलवर टोकन यंत्र अनुदानासाठी अर्ज कसा करावा?

योजना राबवण्याची पद्धत

Krishi Samruddhi Scheme 2024 ही योजना पोकरा (POCRA) च्या यशस्वी मॉडेलवर आधारित आहे. आधी पायलट टप्प्यात ५१४२ गावांत राबवलेली POCRA योजना आता ६००० पेक्षा अधिक गावांमध्ये विस्तारित केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीतील माहिती, उत्पादन, इतर उत्पन्नाची माहिती “ग्रीस्टॅक” पोर्टलवरून गोळा केली जाईल. त्या आधारे योग्य योजना निवडून अंमलबजावणी केली जाईल.

अंमलबजावणीसाठी समिती

या योजनेसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. पोकराचे प्रकल्प संचालक अध्यक्ष असतील, तर इतर वरिष्ठ अधिकारी समितीचे सदस्य असतील.

👉लाडक्या बहिणींना मे महिन्याच हप्ता वितरण सुरू👈

समितीच्या जबाबदाऱ्या:

  • जिल्हानिहाय गरजांची ओळख
  • कुठे गोदाम, कुठे यंत्रसामग्री, कुठे सिंचन गरजेचे याचे मूल्यांकन
  • १५ दिवसांत (३० जूनपूर्वी) शासनाला अहवाल सादर

अर्ज प्रक्रिया आणि एक खिडकी प्रणाली

Krishi Samruddhi Scheme 2024 सध्या विविध योजना विविध पोर्टलवरून राबवल्या जातात – जसे की महाडीबीटी, पोकरा, जिल्हा परिषद योजना, इ. यामुळे शेतकरी गोंधळात पडतात.

या योजनेनंतर, एक सिंगल विंडो पोर्टल (One Farmer One Portal) सुरू करण्याची शक्यता आहे – जिथे शेतकऱ्यांना सर्व अर्ज, अनुदान, माहिती एकाच ठिकाणी मिळेल.

हे ही पाहा : लखपती दीदी योजना 2025 – महिलांसाठी ₹5 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज

पहिल्या वर्षाची तरतूद

पहिल्या वर्षासाठी ५००० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली असून पावसाळी अधिवेशनाआधी तो वापरण्याचा शासनाचा मानस आहे.

या योजनेतून होणारे लाभ:

  • शेतकऱ्यांचे भांडवली खर्च कमी
  • शेतमालाच्या बाजारपेठेसह जोडणी
  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
  • एकाच अर्जात अनेक योजनेचा लाभ

हे ही पाहा : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण योजना: ओळखपत्र मिळवून विविध योजनांचा लाभ घ्या

शेतकऱ्यांच्या शंकांचं उत्तर

Krishi Samruddhi Scheme 2024 “योजना आली म्हणजे भ्रष्टाचार होणार, लाभ पोहोचणार नाही” – अशा प्रतिक्रिया येतात. पण एकत्रित योजना आणि पारदर्शक डिजिटल प्रणालीमुळे, शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.

कृषी समृद्धी योजना ही शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. या योजनेतून भविष्यातील शेती संकटं कमी, उत्पन्न वाढवण्याचे मार्ग खुले, आणि शासनाचा ताळेबंद शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरण्यात येईल.

हे ही पाहा : “2025 मध्ये ट्रॅक्टरसाठी किती अनुदान मिळते? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक”

आपण काय करावे?

  • आपल्या शेताची माहिती अपडेट ठेवा
  • ग्रीस्टॅक पोर्टलमहाडीबीटीवर खात्री करा
  • योजनांबद्दलची माहिती सतत मिळवत रहा Krishi Samruddhi Scheme 2024
WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment