bakri palan yojana महिला बचत गटांना 100 टक्के अनुदानावर दिल्या जाणाऱ्या 10 शेळी 1 बोकड गट वाटपाचे योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. राज्यातील महिला बचत गटांना केंद्रीय विशेष सहा योजनेच्या अंतर्गत 10 शेळी 1 बोकड 100% अनुदानावर दिल्या जाते.
bakri palan yojana
योजनेच्या मार्गदर्शक सूचनामध्ये नवीन बदल करण्यात आले आहे. याच संदर्भातील शासन निर्णय 22 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
जुना शासन निर्णय
26 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये आदिवासी महिला बचत गटांसाठी 100% अनुदानावर 10 शेड 1 बोकड ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेची अंमलबजावणी करत असताना या योजनेमधील काही नियमांमध्ये बदल करणे अपेक्षित होते.
हे ही पाहा : दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज
नवीन शासन निर्णय
bakri palan yojana आयुक्त आदिवासी विकास यांच्या माध्यमातून 17 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाला पत्र लिहिण्यात आले होते.
करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहे.
एकूण लाभार्थी 482 बचत गट ठरवण्यात आले होते या ऐवजी निवड झालेल्या लाभार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शेळी गटाच्या उस्मानाबादी, संगमनेरी अथवा स्थानिक जातींना अनुदेय असणाऱ्या रकमेवर लाभार्थी संख्या ठरेल.
यामध्ये कमीत कमी 482 गटांना शेळी वाटप केले जाईल.
या पेक्षा जर रक्कम शिल्लक राहिले तर जास्तीच्या बचत गटांना देखील या अंतर्गत सहाय्यक केला जाणार आहे.
या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये देखील काही बदल करण्यात आले आहे.
👉योजनेची सविस्तर माहितीसाठी जाणून घ्या👈
योजनेसाठी येणाऱ्या खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक
bakri palan yojana शेळी खरेदी करता 8 हजार रुपये प्रति शेळी उस्मानाबादी, संगमनेरी शाळेसाठी 10 शेळ्यांसाठी 80 हजार रुपये.
स्थानिक जातीच्या शेळीसाठी 6 हजार रुपये.
10 शेळ्यांसाठी 60 हजार रुपये.
बोकड खरेदीसाठी 10 हजार रुपये प्रति बोकड.
स्थानिक जातीच्या बोकडासाठी 8 हजार रुपये.
शेळ्यांचा बोकड्याचा विमा उतरवण्यासाठी 13 हजार 545 रुपये.
स्थानिक जातीच्या प्रजातीसाठी 10 हजार 231 रुपये.
असे एकूण खर्च उस्मानाबादी, संगमनेरी जमातीसाठी 1 लाख 3 हजार 500 रुपये तर अन्य स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी 78 हजार 231 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे.
हे ही पाहा : CMEGP (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम)
कार्यपद्धत
योजना राबवण्याच्या कार्यपद्धतीमध्ये लाभार्थ्याकडून उस्मानाबादी, संगमनेरी जातीच्या पैदा सक्षम शेळ्या बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातून करण्यात येईल या अटीमध्ये बदल करून लाभार्थ्याकडून उस्मानाबादी, संगमनेरी अथवा स्थानिक जातीच्या पैदा सक्षम कोकणाचे शेळ्याचे खरेदी हे प्राधान्यांना अधिकृत बाजारातून करण्यात येईल.
खरेदी केल्यानंतर शेळ्याचा विमा उतरवणे बंधनकारक राहील या अटीऐवजी शेळी गटाचा विमा स्थानिक कंपनीकडून प्रकल्प अधिकारी यांचे नावे काढण्यात यावा आणि सह अर्जदार म्हणून लाभार्थ्याचे नावे हा विमा लावण्यात येणार आहे.
हे ही पाहा : क्रेडिट बी बिजनेस लोन
bakri palan yojana खरेदी शक्यतो एकाच वेळी करावे या अटी ऐवजी सर्व लाभार्थ्या करता शेळी गटाचे खरेदी एकाच वेळी करणे शक्य नसल्यास किमान एका प्रकल्प कार्यालयातील लाभार्थ्या करता शेळी गटाचे खरेदी एकावेळी करण्यात यावी आणि तेही शक्य न झाल्यास तालुका निहाय शेळी गट खरेदी करण्यात यावेत.
लाभार्थ्यांना शेळी गटाचे वाटप करण्यासाठी नजीकची शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाण याची निवड करण्यात यावे.
सदर ठिकाणाहून लाभार्थ्यांना स्वखर्चाने वाहतूक करावयाचे आहे.
हे ही पाहा : किसान क्रेडिट कार्ड इन्स्टंट लोन
निधी वितरणाच्या कार्यपद्धती
योजने करता 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या अंतर्गत कमीत कमी 482 गटांना या निधीचा वाटप करण्यात येणार आहे. bakri palan yojana