ATM card scams एटीएममधून पैसे काढताना पिन क्रमांक विसरला जातो, अशी अनेकांची तक्रार असते. त्यामुळे सहजासहजी विसरता येणार नाही असा, सोपा पिन क्रमांक ठेवण्याकडे कल असतो. सर्वात सोपा आणि कधीही न विसरता येणारा क्रमांक म्हणजे जन्मतारीख. तुम्हीही असे केले असेल तर, त्याचा फटका तुम्हाला बसू शकेल. कारण मागील काही दिवसांत पिन क्रमांक म्हणून जन्मतारीखेचे आकडे ठेवल्याने चोरांकडून आर्थिक फटका बसल्याची काही प्रकरणे उघडकीस आली आहेत.
ATM card scams
एका चोराने अनोखी शक्कल लढवत समाजमाध्यमांवर जन्मतारीख शोधत काहींची बैंक खाती रिकामी केली आहेत. पश्चिम उपनगरात पाकीट चोरी, एटीएम कार्डमधून पैसे काढण्याच्या तक्रारी प्रचंड वाढल्या होत्या. खार परिसरातही अनेक तक्रारी येत होत्या. पाकिटातील पैसे गायब केले जात होते आणि त्याचबरोबर त्यात असलेल्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढण्यात येत होते. पिन माहिती नसताना हे पैसे कसे काढले जात असतील, असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता.
👉ATM PIN Generate करण्यासाठी क्लिक करा👈
त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. सुपे यांच्या पथकाने तपास सुरू केला. खार तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुमारे दोनशेपेक्षा अधिक सीसीटीव्ही फूटेजची झाडाझडती घेतली. या तपासणी दरम्यान एक संशयास्पद तरुण पोलिसांच्या नजरेस पडला. अंधेरी येथून दादर आणि दादरहून कसाराच्या दिशेने जाणाऱ्या या तरुणाला दादर येथे ताब्यात घेण्यात आले.
ATM card scams पोलिसांनी या तरुणाची कसून चौकशी केली असता विनोद पटले असे नाव असल्याचे त्याने सांगितले. अनेक पोलिस ठाण्यात असलेल्या पाकिटचोरीच्या तक्रारींच्या अनुषंगाने त्याची चौकशी केली असता अनेक गुन्ह्यांत त्याचा सहभाग आढळला. विनोद याच्याकडून पोलिसांनी १४९ एटीएम कार्ड हस्तगत केली. पिन क्रमांकाबाबत विचारणा केली असता चोरलेल्या पाकिटात एटीएम कार्ड सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड असतात. यावर संबंधित व्यक्तीचा फोटो असतो.
हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळवा 10 लाखाचे कर्ज
फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर शोधल्यावर चेहरा जुळला की त्या अकाऊंटवर जन्मतारीख शोधली जाते. त्यातील तारीख आणि महिना किंवा वर्ष असा चार अंकी क्रमांक पिन म्हणून ठेवला जातो. त्या व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरून त्यासोबत हे दोन्ही क्रमांक टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विनोदने सांगितले. तीन ते चार जणांचे अशाप्रकारे पिन क्रमांक जुळल्याने पैसे काढण्याची माहिती विनोदने दिली.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
स्कीमर ते पिन क्रमांक
बॅंकव्यतिरिक्त पैसे काढण्याचा पर्याय म्हणून एटीएम सेंटरचा वापर प्रथम सुरू झाला. एटीएमचा वाढता वापर पाहता सायबरचोरांनी एटीएम सेंटरमध्ये स्कीमर आणि छुपे कॅमेरे लावून डेटा चोरी करून पैसे काढले. चोरांची ही गुन्हेपद्धत समजल्याने नंतर फोनद्वारे माहिती मिळवून फसविण्याचे प्रकार सुरू झाले. आता तर समाजमाध्यमांवर असलेली प्रोफाइल पाहून अंदाजे पिन क्रमांक शोधून काढून त्याचा गैरवापर केला जाऊ लागला आहे. ATM card scams
हे ही पाहा : खिशात रुपया नाहीये आणि बिझनेस सुरु करायचाय? जाणून घ्या लोन देणाऱ्या खास योजना
हे लक्षात असू द्या…
■ एटीएमध्ये पैसे काढण्याआधी स्किमर नसल्याची शहानिशा करा.
■ पैसे काढताना कुणाची मदत घेऊ नका.
■ मॉल्स किंवा इतर ठिकाणी कार्ड स्वाइप केल्यानंतर पिन नंबर सांगू नका.
■ डेबिट/क्रेडिट स्वाइप करण्यासाठी कोणाकडे देऊ नका.
■ कुठेही पिन टाकताना कुणी पाहत नाही याची खात्री करा.
■ कार्ड हरविले अगर चोरीला केले तर बँकेमार्फत त्वरित ब्लॉक करा.
■ पैसे काढल्याचे कळताच ताबडतोब सायबर किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा.
हे ही पाहा : किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज
पोलिसाच्याही खात्यातून काढले पैसे
ATM card scams हातसफाईमध्ये विनोद याच्याकडे पोलिसाचे पाकिट सापडले. या पाकिटातील एटीएम कार्डचा वापर करून विनोद याने सुमारे ५० हजार रूपये काढले. या पोलिसाने एटीएम कार्ड चोरीला गेल्याची तक्रार अंधेरी पोलिस ठाण्यात केली आहे.
हे ही पाहा : Personal Loan लेने की सोच रहे हैं? इन डॉक्यूमेंट्स को रखें तैयार, फटाफट हो जाएगा आपका काम
पिन क्रमांकाबाबत बाळगा सावधगिरी
तुमच्या पिन क्रमांकाचा अंदाज लावणे कठीण असेल •. परंतु लक्षात ठेवणे सोपे जाईल, असा क्रमांक ठेवावा. पिन ठेवताना जन्मतारीख, फ्लॅटचा क्रमांक, वाहनाचा क्रमांक, नातेवाईकांपैकी एखाद्याची जन्मतारीख, लग्नाची तारीख, मोबाइल क्रमांकातील अंक किंवा वैयक्तिक जिवनाशी निगडीत कोणताही क्रमांक नसावा. पिन नंबर ठराविक कालावधीनंतर बदलत राहा. ATM card scams