mahayuti महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी 22 ते 34 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे जवळपास 19 नेते या दिवशी मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, गणेश नाईक, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ अशा नव्या चेहऱ्यांना दिली जाणार असल्याची शक्यता आहे.
mahayuti
भाजपला या निवडणुकीत सर्वाधिक यश आलं आहे. भाजपचे तब्बल 132 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात भाजपच्या मंत्र्यांची संख्या जास्त राहणार आहे. दुसरीकडे 5 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेचे 5 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. हे सर्व नेते गेल्या सरकरमधील मंत्रीच असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? उद्या स्पष्ट होण्याची शक्यता
विशेष म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ते उद्या स्पष्ट होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून गटनेता निवडण्यात आला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी सर्वानुमते एकनाथ शिंदे यांचं नाव निश्चित केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार यांचं नाव निश्चित केलं आहे. पण भाजपच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या असल्या तरी गटनेता निवडीचा कार्यक्रम पार पडलेला नाही.
mahayuti भाजपच्या पक्ष नियमानुसार पक्षाचे निरीक्षक महाराष्ट्रात येऊन गटनेता निवडणार आहेत. त्यानुसार, भाजपचे दोन निरीक्षक उद्या मुंबईत येणार असून आमदारांसोबत चर्चा करुन गटनेता निवड करणार आहेत. भाजपचा गटनेताच मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतच्या सस्पेन्सवर उद्या पडदा पडणार आहे.
हे ही पाहा : शेती खरेदी कर्ज योजना 2024
भाजपचे ‘हे’ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ, सूत्रांची माहिती
- देवेंद्र फडणवीस
- चंद्रशेखर बावनकुळे
- चंद्रकांत पाटील
- पंकजा मुंडे
- गिरीश महाजन
- आशिष शेलार
- रवींद्र चव्हाण
- अतुल सावे
- सुधीर मुनगंटीवार
- नितेश राणे mahayuti
- गणेश नाईक
- मंगलप्रभात लोढा
- राहुल नार्वेकर
- अतुल भातखळकर
- शिवेंद्रराजे भोसले
- गोपीचंद पडळकर
- माधुरी मिसाळ
- राधाकृष्ण विखे पाटील
- जयकुमार रावल
हे ही पाहा : विद्यार्थी कर्ज/शिक्षण कर्ज सविस्तर माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘हे’ नेते घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ
- अजित पवार
- धनंजय मुंडे
- छगन भुजबळ
- हसन मुश्रीफ
- दिलीप वळसे पाटील
- अदिती तटकरे
- धर्मरावबाबा आत्राम mahayuti
हे ही पाहा : पशु किसान क्रेडिट योजना कर्ज काढा जनावरे घ्या
शिवसेनेचे ‘हे’ नेते घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ
- एकनाथ शिंदे
- दीपक केसरकर
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- गुलाबराव पाटील
हे ही पाहा : थेट कर्ज योजना 2024