apply for voter id 2025 online भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदणी व नवीन Voter ID Card काढण्याची प्रक्रिया अपडेट केली आहे. आता आधार क्रमांक अनिवार्य असून ई-साइन प्रणाली लागू केली आहे. या ब्लॉगमध्ये पायरी-पायरीने संपूर्ण मार्गदर्शन व अधिकृत लिंक जाणून घ्या.
apply for voter id 2025 online
मित्रांनो, लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या हक्काचा उपयोग करण्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID Card) आवश्यक असते.
2025 पासून भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल केली आहे. या प्रक्रियेत ई-साइन (E-Sign) अनिवार्य केले गेले असून, आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक आहे.
अधिकृत वेबसाईट
apply for voter id 2025 online मतदार नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईट आहे:
👉 https://www.nvsp.in
👉 https://voters.eci.gov.in
नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया (Step by Step)
1. खाते तयार करा (Sign Up)
- वेबसाईटवर जा: voters.eci.gov.in
- “Sign Up” पर्याय निवडा
- मोबाईल नंबर टाका (ईमेल आयडी ऑप्शनल आहे)
- कॅप्चा टाकून OTP Verify करा
- खाते यशस्वीरित्या तयार होईल
2. लॉगिन करा
- “Login” पर्यायावर क्लिक करा
- मोबाईल नंबर व कॅप्चा टाका
- आलेला OTP भरून Verify & Login करा

मतदान यादीत नवीन नाव नोंदणी करण्यासाठी क्लिक करा
3. फॉर्म-6 भरा (New Voter Registration)
apply for voter id 2025 online फॉर्म-6 हे नवीन मतदार नोंदणीसाठी असते. यासाठी:
- राज्य, जिल्हा व मतदारसंघ निवडा
- वैयक्तिक माहिती (नाव, आडनाव, वडिलांचे नाव/पती/आईचे नाव) भरा
- पासपोर्ट साईज फोटो (2MB च्या आत) अपलोड करा
4. संपर्क माहिती (Contact Details)
- मोबाईल नंबर अनिवार्य आहे
- ईमेल आयडी ऐच्छिक आहे
5. आधार माहिती
- आधार क्रमांक टाका
- हा क्रमांक ई-साइन प्रक्रियेसाठी वापरला जाईल
6. जन्मतारीख व पुरावे (DOB Proof)
apply for voter id 2025 online खालीलपैकी कोणतेही कागदपत्र अपलोड करू शकता:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- दहावी/बारावी मार्कशीट
- जन्म दाखला
- पासपोर्ट
(फाईल 2MB च्या आत व Self Attested असावी)
7. पत्ता तपशील (Address Proof)
- घर क्रमांक, गल्लीनाव, गाव/शहर, पोस्ट ऑफिस, पिनकोड, तालुका व जिल्हा भरा
- पत्ता पुरावा म्हणून खालीलपैकी एक अपलोड करा:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- वीज/पाणी बिल
- सातबारा उतारा
- रेंट डीड
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi | लठ्ठपणा कमी करण्याचे सोपे मार्ग
8. विशेष माहिती
- दिव्यांग व्यक्ती असल्यास प्रमाणपत्र अपलोड करा apply for voter id 2025 online
- कुटुंबातील सदस्याचा मतदार क्रमांक असल्यास टाका
9. घोषणापत्र (Declaration)
- आपण भारतीय नागरिक आहात याची खात्री द्या
- जन्मस्थान व पत्ता तपशील भरा
- आपण त्या पत्त्यावर किती काळापासून राहता याची माहिती द्या
10. ई-साइन प्रक्रिया
ही नवीन व अनिवार्य पायरी आहे:
- “E-Sign & Submit” वर क्लिक करा
- आधार क्रमांक टाका
- आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल
- OTP भरून सबमिट करा apply for voter id 2025 online
11. अर्जाची पावती (Acknowledgement)
- अर्ज सबमिट झाल्यावर Reference Number मिळेल
- हा नंबर जपून ठेवा कारण तो Status Check आणि Download Voter ID साठी आवश्यक आहे
अर्जाची स्थिती तपासा (Track Application)
- “Track Application Status” वर क्लिक करा
- Reference Number टाका apply for voter id 2025 online
- सध्याची स्थिती (Submitted / Under Verification / Approved) पाहता येईल
मतदार ओळखपत्र डाउनलोड (Download Voter ID)
- अर्ज मंजूर झाल्यावर EPIC Number (Voter ID Number) मिळेल
- “Download e-EPIC” या पर्यायावर क्लिक करा
- राज्य निवडा, EPIC Number टाका
- मोबाईल OTP Verify करून Voter ID PDF डाउनलोड करा
जीएसटीच्या नवीन दरामुळे ट्रॅक्टर व कृषी यंत्रसामग्री स्वस्त – शेतकऱ्यांना मोठा दिलासा
महत्वाच्या सूचना
- अर्ज सबमिट केल्यानंतर 10–15 दिवसांनी Status तपासा
- फोटो अपलोड करताना चष्मा, टोपी घालू नका
- दस्तऐवज Self Attested करून अपलोड करणे अनिवार्य आहे
- आधारशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे
apply for voter id 2025 online मित्रांनो, भारत निवडणूक आयोगाने डिजिटल पद्धतीने ई-साइन + आधार लिंकिंग अनिवार्य करून मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित केली आहे.
ही प्रक्रिया थोडी लांब असली तरी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्याने ती सोपी आहे. योग्य वेळी मतदार यादीत नाव नोंदवून आपला लोकशाही हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
जय हिंद, जय भारत!