E Peek Pahani App 2025 ईपीक पाहणी अॅप 2025 मधील नवीन अपडेट, रजिस्ट्रेशन, लॉगिन, पीक माहिती नोंदणी व सरकारी योजनांचे फायदे कसे मिळवायचे याचे संपूर्ण मार्गदर्शन.
E Peek Pahani App 2025
शेतकऱ्यांना पिकविमा, अतिवृष्टी नुकसानभरपाई, तसेच इतर शासकीय योजना मिळवण्यासाठी पीक माहिती अचूक नोंदवणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला ईपीक पाहणी (E-Peek Pahani) असे म्हणतात. महाराष्ट्र शासनाने यासाठी एक मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले आहे.
👉 हे अॅप Google Play Store वर मोफत उपलब्ध आहे.
🔗 अधिकृत ईपीक पाहणी अॅप डाउनलोड लिंक
ईपीक पाहणी अॅप डाउनलोड व अपडेट कसे करावे?
- मोबाईलमध्ये आधीचे जुने वर्जन असल्यास ते डिलीट करा.
- नवे वर्जन 4.0.0 डाउनलोड करा. E Peek Pahani App 2025
- इन्स्टॉल केल्यानंतर सर्व permissions Allow All करा.
लॉगिन आणि नोंदणी प्रक्रिया
- अॅप उघडल्यानंतर आपला महसूल विभाग (नागपूर, अमरावती, कोकण, छत्रपती संभाजीनगर इ.) निवडा.
- शेतकरी म्हणून मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे लॉगिन करा.
- नवी नोंदणी करायची असल्यास “नोंदणी करा” वर क्लिक करा.

ऑनलाइन ई पीक पाहणी करण्यासाठी क्लिक करा
कायम पडी (Permanent Crop Details) कशी नोंदवावी?
- खाते क्रमांक किंवा सर्वे नंबर निवडा. E Peek Pahani App 2025
- कायम पडी (विहीर, बोर, चराईपड, शेततळे इ.) निवडून त्याची माहिती भरा.
- किती गुंठे क्षेत्र आहे ते भरा (उदा. 0.05 = 5 गुंठे).
- आवश्यकतेनुसार फोटो अपलोड करा.
बांधावरील झाडांची नोंद कशी करावी?
- सर्वे नंबर टाका.
- झाडाचा प्रकार निवडा (आंबा, लिंबू, चिंच, नारळ, बाबळ इ.).
- झाडांची संख्या भरा.
- दोन फोटो अपलोड करा.
👉 E Peek Pahani App 2025 या झाडांची नोंद झाल्यास भविष्यात शेतकऱ्यांना झाडांसंबंधित शासकीय अनुदाने मिळण्यास मदत होते.
पीक माहिती नोंदणी प्रक्रिया
- खाते क्रमांक व सर्वे नंबर निवडा.
- क्षेत्रफळ (एकर/गुंठा) नमूद करा.
- हंगाम निवडा (खरीप, रब्बी, उन्हाळी).
- पिकाचा प्रकार निवडा (सोयाबीन, ज्वारी, मका, उडीद, भात, फळबाग इ.).
- सिंचनाचे साधन (विहीर, बोअर, ड्रिप, पावसाळी) निवडा.
- पेरणीची तारीख भरा.
- पिकाचे दोन फोटो अपलोड करा.
- माहिती सबमिट करून सेव्ह करा.
गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी खूशखबर! मोठ्या बँकांनी व्याज केलं कमी | EMI होणार स्वस्त
फोटो नोंदवण्याचे नियम
- E Peek Pahani App 2025 कायम पडी व पीक पाहणीसाठी 2 फोटो आवश्यक आहेत.
- फोटो घेताना GPS लोकेशन, लाँगिट्यूड-लॅटिट्यूड अचूक असणे गरजेचे आहे.
- चुकीचे फोटो असल्यास ते 48 तासांत दुरुस्त करता येतात.
ऑफलाईन मोडमध्ये पाहणी कशी करावी?
बर्याच वेळा नेटवर्क समस्या येते. त्यासाठी अॅपमध्ये Offline Mode उपलब्ध आहे.
- पाहणीची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करा.
- नेटवर्क आल्यावर Upload बटणावर क्लिक करून डेटा पाठवा.
दुरुस्ती किंवा डिलीट कसे करावे?
- E Peek Pahani App 2025 भरलेली माहिती चुकीची असल्यास 48 तासांच्या आत दुरुस्ती करू शकता.
- माहिती पूर्णपणे चुकीची असल्यास Delete पर्याय निवडा.
- एकाच अॅपमधून एकापेक्षा जास्त खातेदारांची नोंदणी करता येते.
ईपीक पाहणीचे फायदे
- पिकविमा योजनेत लाभ.
- अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळण्यास मदत.
- शेतकरी कर्जमाफी किंवा इतर शासकीय योजनांसाठी आवश्यक.
- बांधावरची झाडं, फळबाग यांची नोंद झाल्यास अनुदाने व सवलती मिळतात.
- शेतकरी व शासन यांच्यातील पारदर्शकता वाढते.
2025 मध्ये GST दर कपात – रोजच्या वस्तू होणार स्वस्त
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- ❓ ईपीक पाहणीसाठी कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत?
- फक्त मोबाईल नंबर, खाते क्रमांक, सर्वे नंबर व शेतकऱ्याचे नाव.
- ❓ नोंदणी केल्यानंतर माहिती बदलता येते का?
- हो, 48 तासांच्या आत दुरुस्ती करता येते.
- ❓ फोटो अपलोड करताना नेटवर्क नसेल तर काय करावे?
- ऑफलाईन मोड वापरून माहिती सेव्ह करा व नंतर अपलोड करा.