100 percent fee waiver Maharashtra 2025 महाराष्ट्रातील अनाथ विद्यार्थ्यांसाठी सरकारने 100% फी माफी योजना लागू केली आहे. या ब्लॉगमध्ये जाणून घ्या पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत GR लिंक.
100 percent fee waiver Maharashtra 2025
महाराष्ट्रातील हजारो अनाथ मुलामुलींसाठी शिक्षण हे स्वप्नच बनत होते. आर्थिक अडचणींमुळे कित्येक मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. मात्र, आता त्यांच्यासाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास विभाग मार्फत 100% फी माफी योजना जाहीर केली आहे.
ही योजना फक्त आर्थिक मदत नव्हे, तर एका उज्वल भविष्यासाठीची संधी आहे. चला तर मग, जाणून घेऊया या योजनेचे तपशील, पात्रता, अटी आणि अर्ज कसा करायचा हे.

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
योजना कोणासाठी आहे?
100 percent fee waiver Maharashtra 2025 ही योजना फक्त अनाथ विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी लागू करण्यात आली आहे. म्हणजेच, ज्यांचे पालक हयात नाहीत, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पात्रता निकष (Eligibility Criteria)
- अधिकृत अनाथ प्रमाणपत्र – महिला व बाल विकास विभागाकडून जारी केलेले.
- डोमिसाईल सर्टिफिकेट (महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र) आवश्यक.
- कौटुंबिक उत्पन्न – जर उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे शक्य नसेल, तर ग्राम महसूल अधिकारी किंवा सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणन ग्राह्य धरले जाईल.
- अर्जदाराने पदवी स्तरापर्यंतचा अभ्यासक्रम चालू ठेवलेला असावा.
हे ही पाहा : महिलांसाठी शिलाई मशीन योजना 2025: ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज | संपूर्ण मार्गदर्शक
कोणत्या शैक्षणिक संस्थांमध्ये लागू आहे ही योजना?
- सरकारी अनुदानित महाविद्यालये
- अंशतः अनुदानित संस्थांनी
- कायम विना-अनुदानित संस्थांनी
- तंत्रनिकेतने (Polytechnic Colleges)
- सार्वजनिक विद्यापीठे
- CAP (Centralized Admission Process) द्वारे प्रवेश घेतलेले विद्यार्थी
- व्यवस्थापन कोट्याद्वारे थेट प्रवेश घेणारे विद्यार्थी
कोणत्या अभ्यासक्रमांना ही सवलत लागू नाही?
- ओपन लर्निंग
- डिस्टन्स लर्निंग
- व्हर्च्युअल लर्निंग
- पार्ट टाइम कोर्सेस

👉मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मोठा अपडेट, या महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर👈
सवलतीचा प्रकार आणि कालावधी
- पूर्वी: काही वर्गांना 50% सवलत होती (उदा. EWS, SEBC). 100 percent fee waiver Maharashtra 2025
- आता: अनाथ विद्यार्थ्यांना 100% फी माफी लागू.
- कालावधी: अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत.
- जर विद्यार्थी अभ्यासक्रम अर्धवट सोडला, तर पुढील फी शासनाकडून दिली जाणार नाही.
अर्ज कसा करायचा?
- अधिकृत वेबसाइट – https://womenchild.maharashtra.gov.in
- संबंधित महाविद्यालय किंवा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून
- आवश्यक कागदपत्रे:
- अनाथ प्रमाणपत्र (महिला व बाल विकास विभाग)
- डोमिसाईल सर्टिफिकेट
- महाविद्यालय प्रवेश दस्तावेज
- उत्पन्न प्रमाणपत्र (नसेल तर अधिकाऱ्याचे प्रमाणन) 100 percent fee waiver Maharashtra 2025
- कॉलेज कडून आवश्यक ती सगळी माहिती भरून GR नुसार शुल्क माफ केले जाईल.
हे ही पाहा : ZP पुणे अंगणवाडी भरती 2025 – सेविका आणि मदतनीससाठी ऑनलाईन अर्ज सुरू!
महत्त्वाच्या अटी व सूचना
- डबल बेनिफिट मिळणार नाही – विद्यार्थ्यांनी अनाथ आरक्षणातील 100% फी माफी किंवा सामाजिक आरक्षणातील स्कॉलरशिप – यापैकी एकच योजना निवडावी लागेल. 100 percent fee waiver Maharashtra 2025
- कॉलेजेसनी विद्यार्थ्यांना अडवू नये – जरी फी शासनाकडून उशिरा मिळाली तरी.
- चुकीची माहिती दिल्यास दंड – व्याजासह रक्कम परत करावी लागेल.
- अंमलबजावणी अधिकार – आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्याकडे जबाबदारी.
- शासनाला हक्क आहे की, कोणत्याही वेळी योजना नियम बदलू शकतात.
GR डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक
👉 महिला व बाल विकास विभाग – GR पाहा
(टीप: अधिकृत GR 2025 मध्ये प्रकाशित करण्यात आला असून, वेबसाइटवर अद्ययावत स्वरूपात उपलब्ध आहे.)

हे ही पाहा : किमान गुंतवणुकीत हाय‑प्रेशर वॉशिंग बिझनेस : संपूर्ण मार्गदर्शिका
या योजनेमुळे होणारे फायदे
- शिक्षणाची आर्थिक चिंता दूर
- पदवीपर्यंत मोफत शिक्षण
- अनाथ विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणारी कल्याणकारी योजना
- सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये लागू
वाचकांसाठी आवाहन
100 percent fee waiver Maharashtra 2025 जर तुमच्या परिसरात, समाजात किंवा घरामध्ये अशा अनाथ विद्यार्थ्यांची माहिती असेल, तर त्यांच्यापर्यंत ही योजना नक्की पोहोचवा. त्यांना अर्जासाठी मदत करा, आणि त्यांचे भविष्य उज्वल बनवा.
हे ही पाहा : 2025 मध्ये यशस्वी होणाऱ्या ४ वेगळ्या व्यवसाय कल्पना – घरबसल्या लाखोंची कमाई
महाराष्ट्र सरकारची ही योजना म्हणजे एका सकारात्मक समाजनिर्मितीचा भाग आहे. पैशांअभावी कुणाचेही शिक्षण थांबू नये, हाच तिचा उद्देश आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि शासनाने तो हक्क प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
